AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूर-मुरबाड रस्ता बनला मृत्यूचा सापळा; एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमधून संताप

बदलापूर शहरातून मुरबाडला जाण्यासाठी बारवी डॅममार्गे एकमेव रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघाताला अमंत्रण मिळत आहे.

बदलापूर-मुरबाड रस्ता बनला मृत्यूचा सापळा; एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमधून संताप
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 10:12 AM
Share

मुंबई –  बदलापूर शहरातून मुरबाडला जाण्यासाठी बारवी डॅममार्गे एकमेव रस्ता आहे. याच रस्त्याचा वापर हा अहमदनगर, शिर्डी, माळशेज, शहापूर, नाशिककडे जाण्यासाठी केला जातो. त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. परंतु सध्या या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून, चालकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहेत. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

डागडूजीची जबाबदारी एमआयडीसीकडे 

या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी ही एमआयडीसीकडे आहे. मात्र एमआयडीसीनं गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता अक्षरशः वाऱ्यावर सोडलाय. त्यामुळं वाहनचालकांना याचा मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतोय. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.  या रस्त्याच्या अवस्थेबाबत स्थानिक आमदार किसन कथोरे यांना विचारलं असता, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आपण अनेकदा एमआयडीसीच्या मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत पत्रव्यवहार केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र तरीही एमआयडीसी रस्त्याकडे लक्ष देत नसून, एमआयडीसीला फक्त जागा खरेदी आणि विक्री करणे इतकाच धंदा असल्याची टीका कथोरे यांनी केली

यावर्षी खड्डे बुजवलेच नाहीत

दरवर्षी बारवी धरण भरल्यानंतर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी धरणावर जलपूजन करण्यासाठी येत असतात. त्यांच्या येण्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती केली जाते. मात्र यावर्षी जलपूजन झालेलंच नाही. त्यामुळेच यंदा रस्त्याच्या दुरवस्थेकडेही एमआयडीसीनं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळं आता नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष द्यायला एमआयडीसीला कोणता मुहूर्त सापडतो हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या 

आधी तुरुंगातील जेवण घ्या, अनिल देशमुखांना कोर्टाने फटकारले; घरचे जेवण देण्याची मागणी फेटाळली

ते मानानं मोठे, पण त्यांनी काहीही सूचवावं हे चालणार नाही; अभिनेते गोखलेंच्या वक्तव्यावर पेडणेकरांचे शेलके ताशेरे

मोफत शिक्षण कायद्याची तरतूद खासगी संस्थांना लागू करा; शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात नाशिकमध्ये मागणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.