AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ठाण्यातून काहीतरी गौडबंगाल होतंय, योग्यवेळी नावं सांगणार…”; अक्षय शिंदेच्या वकिलांचा गंभीर आरोप

"कोर्टाने सांगितलं होतं कुटुंबाला सरंक्षण देणार, का सरंक्षण दिलं नाही?" असा सवाल अमित कटारनवरे यांनी विचारला. या प्रकरणी 6 फेब्रुवारीला पुढील सुनावणी आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

ठाण्यातून काहीतरी गौडबंगाल होतंय, योग्यवेळी नावं सांगणार...; अक्षय शिंदेच्या वकिलांचा गंभीर आरोप
akshay shinde lawyer Amit Katarnavare
| Updated on: Feb 03, 2025 | 8:30 PM
Share

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. १२ व १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला होता. या घटनेनंतर आज कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी एक धक्कादायक खुलासा केला. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना धमकावले जात आहे. यामुळे ते प्रचंड दबावात आहेत, असा खुलासा अमित कटारनवरे यांनी केला.

“फसवून सही घेतली होती”

अमित कटारनवरे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सविस्त माहिती दिली. “गेल्या 20 तारखेला जी ऑर्डर झाली, त्यात कोर्टात 4 पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवलं आहे. यात गुन्हा दाखल न केल्यामुळे याचिकेकर्त्याने धमकवलंय अशी मला माहिती मिळाली आहे. त्यामुळे ते प्रचंड दबावात आहे. जे काय पुरावे होते त्याच्या आधारे मला एनओसी मागितली होती. तेव्हा मी माझ्या क्लायंटला विचारलं त्यांनी सांगितलं फसवून सही घेतली होती. हे काय सुरू आहे ते तुम्हीच तपास करा”, असे अमित कटारनवरे म्हणाले.

“ठाण्यातून काही तरी गौड बंगाल होतंय”

“अण्णा बोलले सही माझी होती. मात्र मला हेच वकील हवे आहेत. लेटर आलं होत लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आलं. ज्या वेळेला डॉक्युमेंट टेंडर करायचं असतं, क्लायंट लागतात. ते आजच मला भेटले ते इतके दिवस दिसले नव्हते. ठाण्यातून हे रजिस्टर्ड पोस्ट आलंय. इंग्लिश मधून आलंय. त्यांना इंग्लिश येत नाही. याची शहानिशा केली. तर ते म्हणाले आम्हाला तुम्हीच वकील हवे आहात. ठाण्यातून काही तरी गौड बंगाल होतेय, योग्य वेळी मी दबाव टाकणाऱ्यांची नावे सांगणार आहे. सुन आणि नातवाला धमकी मिळत असेल. ते गावी निघून गेले”, असेही अमित कटारनवरे यांनी म्हटले.

“या केसवर काडीमात्र फरक पडणार नाही”

“जो कोणी याच्या मागे आहे, त्याने हे प्रकार थांबवायला हवेत नाही तर मी योग्य ती कारवाई करीन. सरकारी वकील आज नाहीत त्यांची खाजगी अडचण आहेत. हस्तक्षेप अर्ज फाईल केला आहे. पण त्यांची कॉपी मिळाली नाही. या केसवर काडीमात्र फरक पडणार नाही. आताची परिस्थिती अशी की पोलीस जे भार्स्ट आहेत. त्यांच्या बाजूने पोलिसांना वाचवण्यासाठी जे राजकारणी आहेत आणि या कुटुंबसाठी अशी तिहेरी लढाई सुरु आहे”, असेही अमित कटारनवरे यांनी सांगितले.

“कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार”

“कोर्ट म्हणतंय आम्हाला हेच सल्ला केलं की आम्हाला शपथपत्र द्यायला हवं. पण माझे क्लाईंट मला भेटले नव्हते. कोर्टाने सांगितलं होतं यांना सरंक्षण देणार, कुटुंबाला का दिलं नाही. अद्याप त्यांना सुरक्षा दिली नाही. या प्रकरणी 6 फेब्रुवारीला पुढील सुनावणी आहे. शिरसाट मामा जे म्हणाले आहेत याची त्यांना किंमत मोजावी लागेल, त्यांना उत्तर द्यावं लागेल. कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार”, असेही अमित कटारनवरे म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.