AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी; महाराष्ट्राच्या राजकारणात घडतं काय?

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनैत्रा पवार लढत आहेत. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी सुप्रिया सुळे बारामतीमधील काठेवाडीत मतदानासाठी दाखल झाल्या. त्यानंतर त्या थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहचल्या.

सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी; महाराष्ट्राच्या राजकारणात घडतं काय?
अजित पवार यांच्या निवासस्थानी जाताना सुप्रिया सुळे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 07, 2024 | 11:50 AM
Share

बारामती लोकसभा मतदार संघात नणंद-भावजयी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि एकाच परिवारातील दोन सदस्यांमध्ये ही लढत होत आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनैत्रा पवार यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. आज बारामती मतदार संघासाठी मतदान सुरु आहे. त्याचवेळी सुप्रिया सुळे बारामतीमधील काठेवाडीत मतदानासाठी दाखल झाल्या. त्यानंतर त्या थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहचल्या. पाच मिनिटे त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या. त्याची चांगली चर्चा सुरु झाली आहे.

का आल्या अजित पवार यांच्या निवासस्थानी

सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काठेवाडी येथील घरी मंगळवारी ११ वाजेच्या सुमारास दाखल झाल्या. त्यावेळी घरात अजित पवार होते. परंतु सुनेत्रा पवार नव्हत्या. त्या काकींची भेट घेणे आणि प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांची आणि अजित पवार यांच्याशी काही चर्चा केली नाही. त्या फक्त त्यांच्या काकी आशाताई पवार यांनाच भेटल्या, असे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे अचानक गेल्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

मी आशा काकी यांना नमस्कार करण्यासाठी आले होते. घरात फक्त मी आणि काकीच होते. मी फक्त काकींची भेट घेतली. तुम्ही अजित पवार यांच्या घरी अचानक आल्या? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांचा विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले, हे माझ्या काका, काकींचे घर आहे. माझ्या आयुष्यातील लहाणपण याच घरात गेले आहे. मी या घरात दोन- दोन महिने राहिले आहे. त्यावेळी दोन-दोन महिने माझ्या आईशी बोलणे होत नव्हते. जेवढे माझ्या आईंनी माझे केले नाही, तेवढे माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

कौटुंबिक संबंध वेगळे राहणार

पवार कुटुंबामधील या लढतीत रोहित पवार आक्रमक होऊन अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर आरोप करत आहेत. त्याचे पुरावे सोशल मीडियावर देत आहेत. त्याचवेळी सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. राजकीय लढाई आणि कौटुंबिक संबंध वेगळे असणार? हे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत