AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला तुमची मुलगी शोभत नाही, पिस्तुल दाखवून धमकावले! लग्नाला 11 दिवस बाकी असतानाच पीएसआयचा धक्कादायक कारनामा

मुलीच्या कुटुंबीयांना पिस्तुलचा धाक दाखवून धमकावल्याचा गंभीर आरोपही पीएसआयवर करण्यात आला आहे. आता नेमकं काय घडलं जाणून घ्या...

मला तुमची मुलगी शोभत नाही, पिस्तुल दाखवून धमकावले! लग्नाला 11 दिवस बाकी असतानाच पीएसआयचा धक्कादायक कारनामा
Beed PSIImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 27, 2026 | 11:38 AM
Share

राज्यातील बीड तालुका हा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. आता या तालुक्यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असताना नवरदेवाने लग्नाला नकार दिला. त्याने थेट ‘तुमची मुलगी मला शोभत नाही’ असे म्हणत लग्नाला नकार दिला आहे. तर मुलीच्या कुटुंबीयांना पिस्तुलचा धाक दाखवून धमकावल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

नेमका प्रकार काय?

बीडमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर यांचा विवाह ठरला होता. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती आणि विवाहाला अवघे ११ दिवस शिल्लक होते. मात्र, ऐनवेळी पीएसआय निंबाळकर यांनी ‘मुलगी मला शोभत नाही’ असे कारण पुढे करत लग्नास नकार दिला. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने यावेळी सरकारी पिस्तुलचा धाक दाखवत त्यांना धमकावले. या प्रकारामुळे मुलीच्या कुटुंबाला मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का बसला आहे.

लाखो रुपयांचा खर्च पाण्यात

या घटनेबाबत बोलताना मुलीचे वडील ज्ञानेश्वर जरांगे यांनी आपली व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, “मुलीच्या साखरपुड्यालाच आमचे ५ लाख रुपये खर्च झाले होते. लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे आम्ही मुलीला देण्यासाठी भांडी, फर्निचर आणि इतर सर्व सामानाची खरेदी केली होती. साखरपुडा आणि खरेदी असा एकूण मिळून आमचा १४ ते साडेचौदा लाखांपर्यंतचा खर्च झाला आहे. लग्नाला केवळ ११ दिवस राहिले असताना त्याने अचानक नकार दिल्याने आमचे मोठे नुकसान झाले आहे.”

दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रार

या धक्कादायक प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, पोलीस उपनिरीक्षकाच्या बाजूने देखील एक तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. “आमच्या मुलीला न्याय मिळावा आणि लग्नाच्या तयारीसाठी आमचा जो काही खर्च झाला आहे, तो आम्हाला परत मिळावा,” अशी मागणी मुलीचे वडील ज्ञानेश्वर जरांगे यांनी केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानेच अशा प्रकारचा कारनामा केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us
अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले शरद पवार; नेमकं कारण काय?
अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले शरद पवार; नेमकं कारण काय?.
NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट 'God'..
NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट 'God'...
देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक
देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक.
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं...
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं....
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली.
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा.
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.