Beed Railway : ‘आज भावना शब्दां पलीकडच्या..’ बीडमध्ये रेल्वे आली, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
Beed Railway : अनेक दशकापासून लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि बीडच्या नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतय. गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या रेल्वेसाठी प्रयत्न सुरु होते.

“आज बीड रेल्वे सेवेचा शुभारंभ होतोय, या भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत. यापेक्षाही मोठा कार्यक्रम घ्यायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार” असं मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. “आज बीडच्या रेल्वे सेवेचा शुभारंभ होतोय, या प्रसंगीच्या भावना शब्दांच्या पलीकडील आहेत. अनेक दशक ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, तो क्षण आला आहे. यापेक्षाही मोठा कार्यक्रम जंगी कार्यक्रम घ्यायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानायचे आहेत. त्यांनी यासाठी विशेष तरतुदी केल्या. ज्यांनी, ज्यांनी या रेल्वेमार्गासाठी संघर्ष केला. त्या सर्वांचे मनापासून आभार” असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
अनेक दशकापासून अनेक लोकप्रितिधजी केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि बीडच्या नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतय. गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या रेल्वेसाठी प्रयत्न सुरु होते. अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरु होतं.रेल्वे अर्थसंकल्पात यासाठी 275 कोटी निधीची तरतूद केलेली होती. मध्य रेल्वेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग एकूण 261.25 किलोमीटर लांबीचा आहे.
रेल्वे बीडहून अहिल्यानगरकडे जाणार
बीड रेल्वे उदघाट्न कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांचे फोटो झळकवले. मुंडे समर्थकांनी फोटो दाखवत केला जयघोष. दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे यांचेही फोटो झळकवण्यात आलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार रेल्वे स्थानकावर पोहचले असून अनेक लोकप्रतिनिधी दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रेल्वे बीडहून अहिल्यानगरकडे जाणार आहे.
दबंग खासदार म्हणून फलक
अहिल्यानगर बीड रेल्वेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ आहे. याच दरम्यान विविध पक्षातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवत मुंडे समर्थकांनी मुंडे साहेब अमर रहेच्या घोषणा दिल्या, तर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचाही दबंग खासदार म्हणून फलक झळकावण्यात आला. त्यामुळे सर्वांचे लक्ष या दोन्ही फलकाकडे लागले होते.
