संतोष देशमुख यांच्या मुलाला आणि मुलीला काय व्हायचंय? पहिल्यांदाच सांगितलं मनातलं

या प्रकरणी सरकारकडून विविध चौकशी समिती नेमून चौकशी केली जात आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी सातत्याने मोर्चा, आंदोलन केले जात आहेत.

संतोष देशमुख यांच्या मुलाला आणि मुलीला काय व्हायचंय? पहिल्यांदाच सांगितलं मनातलं
santosh deshmukh daughter son
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 4:33 PM

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्येनंतर राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्व आरोप पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडेच या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणी सरकारकडून विविध चौकशी समिती नेमून चौकशी केली जात आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी सातत्याने मोर्चा, आंदोलन केले जात आहेत.

संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी अनेक गावात सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चा काढण्यात येत आहे. आज जालन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले हाते. यावेळी संतोष देशमुख यांच्या दोन्हीही मुलांनी त्यांना काय व्हायचं याबद्दल भाष्य केले. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, आम्ही मूक मोर्चा सहभागी होतो. आरोपीला ताब्यात घेणे गरजेचे आहे. तपासाचा भाग आहे, पण लवकरात लवकर आरोपी आणि मोबाईल ताब्यात घेतला पाहिजे, आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे, असे म्हणाले.

दुःखातून आम्ही बाहेर पडू की नाही माहित नाही

“माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला, त्यासाठी जर आम्हाला बाहेर पडून न्याय मागावा लागत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाही. आज आमच्यावर, आमच्या कुटुंबियांवर, गावावर दुःख आहे. हे दुःख खूप मोठं आहे, त्या दुःखातून आम्ही बाहेर पडू की नाही माहित नाही. मात्र या दुःखाला थोडंसं मागे सारून न्यायामध्ये पुढे जातोय. ही वेळ आमच्या कुटुंबावरती आली ती दुसऱ्या कोणत्याही कुटुंबियावर येऊ नये, अस आम्हाला वाटतं”, असे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाले.

“मला डॉक्टर व्हायचं आहे. ते माझे स्वप्न आहे. माझ्या अभ्यासाचा विचार केला तर, माझं एक वर्षे बॅक लॉग झालं तर ते मी पुढच्या वर्षी करू शकते, पण अजून न्यायाच्या विषय आहे. माझ्या वडिलांचे बलिदान मला व्यर्थ जाऊ द्यायचं नाही, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. माझ्या वडिलांच्या आधी, घटना किंवा दुसऱ्या प्रकारे ज्यांची हत्या झाली ते आवाज उठवू शकले नाही. आज आपण न्यायासाठी लढतोय, तर आपण सगळ्यांना न्याय देऊ असं मला वाटतं”, असे वैभवी देशमुखने म्हटले.

“…तर कोणीच पुढाकार घेणार नाही”

“माझ्या अभ्यासाचा विषय जो आहे, तो मी पुढच्या वर्षी सुद्धा कव्हर करू शकते. पण हा जर विषय मागे पडला तर कोणीच पुढाकार घेणार नाही. दहावीपर्यंत काय व्हायचं निश्चित नव्हतं पण वडिलांना वाटलं की, ही आता करते तर खूप मोठ व्हावं, स्वतःच्या पायावर उभी राहावी, असे वैभवी देशमुख म्हणाली. तर संतोष देशमुख यांचा मुलगा विराजने मला इंजिनियर व्हायचं आहे”, असे सांगितले

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.