मोठी बातमी! ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर हल्ला, बीडमध्ये खळबळ, थेट दगडफेक करत…
Beed News : माजलगावहून येत असताना मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर मंगेश ससाणे यांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.

अशोक काळकुटे बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा तूफान चर्चेत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. बीडमधील मारहाणीचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले. त्यामध्येच आता ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला झाला. हल्ल्यानंतर मंगेश ससाणे यांनी लगेचच फेसबुक लाईव्ह करत सर्व माहिती दिसली. यादरम्यान ससाणे यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आली, गाडीच्या काचा फुटल्या. या हल्ल्यानंतर त्यांनी धारूर पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. दोन दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला केला. माजलगाव पोलिस स्टेशन येथे भेट देण्यासाठी मंगेश ससाणे पुण्याहून आले होते. यावेळी त्यांनी पवन करवर याच्या प्रकरणात पोलिसांसोबत चर्चा केली. त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर रात्री अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता ॲड. ससाणे हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर माजलगाववरून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून ससाणे यांच्या गाडीवर दगडफेक केली.
गाडीच्या मागच्या आणि बाजूच्या काचावर ही दगडफेक केली. यानंतर तात्काळ ससाणे यांनी धारूर पोलीस ठाणे गाठत या हल्ल्याबाबतची माहिती धारूर पोलिसांना दिल्यानंतर धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससाणे यांनी स्वतः फेसबुक लाईव्ह करत या दगडफेकी बाबतची माहिती रात्री उशिरा दिली. ओबीसी आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मंगेश ससाणे लढत आहेत.
काही दिवसांपूर्वीच ओबीसींच्या लढ्यासाठी ते उपोषणालाही बसले होते. स्वत: मंत्री छगन भुजबळ हे मंगेश ससाणे यांचे उपोषण सोडण्यासाठी पोहोचले होते. हेच नाही तर सुप्रीम कोर्टातही मंगेश ससाणे ओबीसी आरक्षणाची बाजू मांडत आहेत. छगन भुजबळ यांचे मंगेश ससाणे निकटवर्तीय आहेत. त्यामध्येच रात्री उशीरा त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
