शिक्षकाकडून 40 विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

शिक्षकाने वर्गात आठवीच्या विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण केली. ही संतापजनक घटना शहरातील श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घडली .

 शिक्षकाकडून 40 विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
मोठ्याने गुड मॉर्निंग म्हटल्याने शिक्षकाचा विद्यार्थ्यांना चोपImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 6:35 PM

संभाजी मुंडे Tv9 मराठी, प्रतिनिधी, परळी : वर्गात शिक्षक आल्यानंतर नमस्कार किंवा इंग्रजीमध्ये गुड मॉर्निंग म्हणण्याची आपली संस्कृती आहे. त्याच पद्धतीने परळीच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग म्हणणे अंगलट आले आहे. शिक्षक वर्गात आल्यानंतर दैनंदिनपणे विद्यार्थ्यांनी गुड मॉर्निंग म्हटलं. मात्र हेच त्या शिक्षकाला खटकलं. गुड मॉर्निंग नव्हे व्हेरी गुड मॉर्निंग म्हणा, असा फतवा काढत मारकुट्या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या तब्बल 40 विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण केली.

परळी शहर पोलिसांत तक्रार

पालकांनी संस्थेकडे सदर शिक्षकाची तक्रार करताच संस्थेचे अध्यक्ष भिमराव सातभाई यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिक्षकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परळी पोलीस करीत आहेत.

छडीने बेदम मारहाण

शिक्षकाने वर्गात आठवीच्या विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण केली. ही संतापजनक घटना शहरातील श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घडली आहे. याबाबत संबंधित शिक्षकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

परळी शहरातील वडसावित्री नगर भागात मराठवाडा ऊसतोड कामगार मंडळ परळी वै. संचलित श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. शाळेतील शिक्षक बालाजी लक्ष्मण फड आठवीच्या वर्गात गेले. विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात good morning सर म्हणल्याने फड यांनी विद्यार्थ्यांच्या हातावर छडीने जबर मारहाण केली.

मुख्याध्यापकांनी विचारला जाब

मारहाण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाहेर रडत येत मुख्याध्यापक यांना झालेला प्रकार सांगितला. याबाबत फड यांना जाब विचारला असता त्यांनी मोठ्या आवाजात good morning म्हणल्या कारणाने मारहाण केली असल्याचे सांगितले.

संबंधित शिक्षकाने यापूर्वीही असेच विद्यार्थ्यांना मारहाण तसेच अर्वाच्य भाषेत बोलण्याची घटना घडली. फड यांना सांगूनही त्यांच्या वागण्यात काही बदल होत नव्हता. शालेय प्रशासन, विद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी परेशान आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.