AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar-Ashti Railway : नगर-आष्टी रेल्वेला आजपासून सुरुवात! काय आहे या रेल्वेची खासियत? जाणून घ्या

Ahmednagar Ashti Railway : नव्या रेल्वेमुळे आष्टी-नगर पट्ट्यातील प्रवाशांना आणि नागरिकांना फायदा होईल. तसंच स्थानिक व्यापार आणि उद्योगांनाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

Ahmednagar-Ashti Railway : नगर-आष्टी रेल्वेला आजपासून सुरुवात! काय आहे या रेल्वेची खासियत? जाणून घ्या
बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं आज उद्घाटनImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Sep 23, 2022 | 6:18 AM
Share

कुणाल जायकर, प्रतिनिधी, अहमदनगर : बहुप्रतिक्षित नगर-आष्टी रेल्वेच्या (Ahmednagar Ashti Railway) उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. या रेल्वेचा सर्वात मोठा फायदा नगर आणि बीड (Beed) या दोन जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे. आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेते एकाच मंचावर असणार आहेत. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. शिवाय पंकजा मुंडे देखील या उद्घाटन सोहळ्यासाठी हजेरी लावण्याची शक्यताय.

आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. फुलांची सजावट, व्यासपीठ, या सह अनेक गोष्टी आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तयार करण्यात आल्या. या उद्घाटन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नेमकं काय म्हणतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

नगर-आष्टी रेल्वे मार्गाचं वैशिष्ट्य काय?

अहमदनगर-आष्टी रेल्वे मार्ग वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाचा रेल्वे मार्ग ठरणार आहे. एकूण 66 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग आहे. हा रेल्वेमार्ग अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारनेही 50-50 टक्के खर्चाचा वाटा उचलाय.

पाहा व्हिडीओ :

उद्योगाला चालना

नव्या रेल्वेमुळे आष्टी-नगर पट्ट्यातील प्रवाशांना आणि नागरिकांना फायदा होईल. तसंच स्थानिक व्यापार आणि उद्योगांनाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. मराठवड्यातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला या रेल्वेमुळे गती येणार आहे.

किती वाजता सुटणार?

अहमदनगर ते आष्टी ही डेमू ट्रेन नगरहून सकाळी 07 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि आष्टी येथे सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल. दुसरीकडे ही रेल्वे सकाळी 11 वाजता आष्टीवरून सुटून दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी नगरला पोहोचेल. रविवार वगळता दररोज ही रेल्वे सेवा सुरु राहणार आहे. कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोह या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?