AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil | ‘गौतमी, बोल तू होते का माझी परी?’, बीडच्या तरुणाचं पत्र व्हायरल

बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील याने गौतमी पाटीलला पत्र पाठवलंय. "गौतमी पाटील तू भारी तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी? मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे", असं रोहन याने पत्रात म्हटलं आहे.

Gautami Patil | 'गौतमी, बोल तू होते का माझी परी?', बीडच्या तरुणाचं पत्र व्हायरल
| Edited By: | Updated on: May 30, 2023 | 10:43 PM
Share

बीड : आपल्या अदांची भुरळ घालत नजरेच्या इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या, गौतमी पाटीलची सध्या जोरदार चर्चा सुरुय. या चर्चेत पुन्हा भर पडलीय. बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला पत्र लिहीत थेट लग्नाची मागणी घातलीय. “गौतमी तुझ्या इच्छा अटी सर्वमान्य, बोल तू होती का माझी परी..” असं म्हणत आपल्या घराचा पत्ता देत लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असं देखील त्याने पत्रात म्हटलंय.

बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील याने गौतमी पाटीलला पत्र पाठवलंय. “गौतमी पाटील तू भारी तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी? मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहीण्याचे कारण की मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती कि, आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे”, असं रोहन पाटील याने पत्रात म्हटलंय.

तरुणाने पत्रात आणखी काय-काय म्हटलंय?

“गौतमी तू मुलाखतीत म्हणालीय की, मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही. त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे. तरी तुझ्या वरील सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत”, असं रोहन आपल्या पत्रात म्हणाला आहे.

“मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तरी तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्यासोबत कुणी लग्नाला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे. मी एक शेतकरी पुत्र आहे. शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे”, असं रोहनने पत्रात म्हटलंय.

“तू माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये. पत्ता मु.पो.चिंचोली माळी तालुका केज , जिल्हा बीड, या पत्त्यावर तू मला भेटायला ये. मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे”, असे रोहनने या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान वराच्या शोधात असणाऱ्या गौतमी पाटील, बीडच्या या रोहन गलांडे पाटीलाला भेटायला जाणार का? आणि त्याच्यासोबत लग्न करणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या या पत्राची जोरदार चर्चा होत आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.