AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : बीडमध्ये खरेदीच्या बहाण्याने आली, दोन तोळे सोने चोरून पसार झाली, बुरखाधारी महिलेचे कृत्य सीसीटीव्हीत कैद

श्रीराम ज्वेलर्स या सराफ दुकानात 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता एक बुरखा घातलेली महिला आली. महिलेने अनेक दागिने पाहिले. त्यातील काही दागिने तिने पसंतही केले. काही दागिने हातात घेऊन वजन करण्यास सांगितले. सोनार वजन करत असताना तितक्यात हातातील पर्सचाचा आधार घेत या महिलेने तब्बल दोन तोळ्याचे दागिने चोरी केले.

VIDEO : बीडमध्ये खरेदीच्या बहाण्याने आली, दोन तोळे सोने चोरून पसार झाली, बुरखाधारी महिलेचे कृत्य सीसीटीव्हीत कैद
धुळ्यातील कापडणे यात्रोत्सवात चोरीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 15, 2022 | 3:25 PM
Share

बीड : खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका बुरखाधारी महिलेने दोन तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) चोरुन पोबारा केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बीड शहरातली कबाड गल्ली येथील श्रीराम ज्वेलर्स या दुकानात ही चोरीची घटना घडली आहे. केवळ दीड मिनिटात दोन तोळे सोन्यावर डल्ला मारल्याने सराफा व्यापाऱ्यांत खळबळ माजली आहे. याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेची चौकशी सुरु असून चौकशीअंतीच गुन्हा दाखल करण्यात येईल. पोलिस सखोल तपार करीत आहेत. (In Beed a woman wearing a burqa stole gold jewelery from a jewellers shop incident caught in CCTV)

सोन्याची मोजदाद करताना चोरीचा प्रकार लक्षात आला

श्रीराम ज्वेलर्स या सराफ दुकानात 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता एक बुरखा घातलेली महिला आली. महिलेने अनेक दागिने पाहिले. त्यातील काही दागिने तिने पसंतही केले. काही दागिने हातात घेऊन वजन करण्यास सांगितले. सोनार वजन करत असताना तितक्यात हातातील पर्सचाचा आधार घेत या महिलेने तब्बल दोन तोळ्याचे दागिने चोरी केले. त्यानंतर काऊंटर समोरील सोफ्यावर बसून हातातील दागिने पर्समध्ये ठेवले. जेव्हा दुकान बंद करताना सोन्याची मोजदाद केल्यानंतर दोन तोळे दागिने नसल्याचे लक्षात आले. सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. महिला बुरखा परिधान केलेली असल्याने तिला ओळखणे हे एक मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत. (In Beed a woman wearing a burqa stole gold jewelery from a jewellers shop incident caught in CCTV)

इतर बातम्या

Attack | कारने कुत्र्याला उडवल्यावरुन राडा, चालकासह कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण, तिघांना अटक

Police Officer Crushed : पोलीस अधिकाऱ्याला कारखाली चिरडणाऱ्या तिघांना जन्मठेप; मोक्का कोर्टाचा निकाल

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.