खळबळजनक ! परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट

गुरुवारी सकाळीही नेहमीप्रमाणे दोघे शेतात काम करण्यासाठी घरुन निघून गेले. मात्र दुपारी जेवणाची वेळ झाली तरी दोघे घरी जेवायला आले नाहीत. त्यामुळे जेवायला का आले नाही बघायला सटवा यांचा मुलगा शेतात गेला. यावेळी सटवा आणि त्यांची बहिण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.

खळबळजनक ! परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट
चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच चोरट्याने केले पती-पत्नीवर चाकूने वार
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 6:56 PM

परळी : तालुक्यातील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहिण-भावा (Brother-Sister)ची दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना घडली आहे. हत्येची ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. सटवा ग्यानबा मुंडे (68) आणि शुभ्रा ग्यानबा मुंडे (70) अशी हत्या करण्यात आलेल्या बहिण-भावाची नावे आहेत. परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत सटवा मुंडे यांचे शेत आहे. याच शेतात दोघा बहिण-भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती कळताच परळी ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान हत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलिस सखोल तपास करीत आहेत. (In Parli, an elderly sister and brother were brutally stoned to death)

मुलगा जेवायला बोलवायला गेल्यानंतर घटना उघडकीस

मयत सटवा मुंडे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. तर शुभ्रा मुंडे यांचे पतीची जमत नसल्याने त्या कायम आपल्या भावाकडेच राहत होत्या. दोघेही बहिण-भाऊ शेती व्यवसाय सांभाळत होते. दिवसभर दोघेही शेतात काम करायचे. दुपारी जेवणासाठी आणि रात्री झोपण्यासाठी केवळ घरी यायचे. गुरुवारी सकाळीही नेहमीप्रमाणे दोघे शेतात काम करण्यासाठी घरुन निघून गेले. मात्र दुपारी जेवणाची वेळ झाली तरी दोघे घरी जेवायला आले नाहीत. त्यामुळे जेवायला का आले नाही बघायला सटवा यांचा मुलगा शेतात गेला. यावेळी सटवा आणि त्यांची बहिण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. यानंतर परळी ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. धार्मिक वारसा असलेल्या जिरेवाडीत गुरुवारी बहिण-भावांची हत्या झाल्याने गाव हादरले आहे.

गोंदियात एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या मुलीची निर्घृण हत्या

एकतर्फी प्रेमातून अकराव्या वर्गात शिकणाऱ्या प्रेयसीची आरोपी प्रियकराने हातोड्याने वार करत निर्घृण हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिरामणटोला येथे घडली आहे. दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले असे आरोपीचे नाव असून पीडितेची हातोडीने डोक्यावर वार करुन निर्घृण हत्या केली. ट्युशनवरुन परत येत असताना काळ आपली रस्त्यात वाट पाहत आहे, याची कोणतीही जाणीव नसलेल्या धनश्रीची हातोडीने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली. आरोपी अनेक दिवसापासून या प्रेमासाठी तगादा लावला होता. मात्र धनश्रीकडून या एकतर्फी प्रेमाला दुजोरा मिळत नसल्याने संतापलेल्या प्रियकर असलेल्या आरोपीने हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्या केल्यानंतर आरोपीला गावातील लोकांनी घेराव घातला. लोकांचा जमाव पाहता आरोपीने स्वतःवर हातोडीने वार करत जखमी करून घेतले होते. मात्र लोकांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. (In Parli, an elderly sister and brother were brutally stoned to death)

इतर बातम्या

Nagpur Crime | आधी मुलावर अत्याचार आता दारूसाठी खंडणी, नागपूर पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Kalyan Crime : कल्याणमध्ये 55 किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड, भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमध्ये कारवाई

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.