AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता, सूत्रांकडून मोठी बातमी

बीड सरंपच हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणी सीआयडीने फरार आरोपींना पळून जाण्यात मदत करणाऱ्या संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या चौकशीत मोठा खुलासा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता, सूत्रांकडून मोठी बातमी
Santosh Deshmukh Murder case
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 9:39 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार तीनही आरोपींना मदत करणारा संशयित आरोपींना सीआयडीने ताब्यात घेतलं आहे. धारूरच्या कासारीतून डॉ. संभाजी वायबसे यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वातील एसआयटीने तिघांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांनी या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे याच्यासर सुधीर सांगळेला फरार होण्यात मदत केल्याचा संशय आहे. तीनही संशयित आरोपींची दीड तासांपासून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान अनेक खुलासे होण्याची मोठी शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. सीआयडीकडून युद्ध पातळीवर तपास सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सीआयडीने 100 पेक्षाही जास्त जणांचा जबाब नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणात सीआयडीने आरोपींच्या फोनची कॉल हिस्ट्री, सीडीआर तपासला आहे. सीआयडीला आरोपींच्या स्कॉर्पिओ गाडीतून मोबाईलदेखील सापडले आहेत. त्या मोबाईलमधून व्हिडीओ देखील प्राप्त झाल्याची चर्चा आहे. पण असं असलं तरीही तपासात आतापर्यंत काय-काय पुरावे मिळाले, याबाबत पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत खुलासा होणार नाही. या प्रकरणात सीआयडीचा युद्ध पातळीवर तपास सुरु आहे.

धनंजय देशमुख यांची चार तासांपासून CID आणि SIT सोबत चर्चा

सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची आज सायंकाळी 5 वाजल्यापासून CID आणि SIT च्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास कामाला गती आलेली बघायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी नंतर आता बंधू धनंजय देशमुख यांच्याशी पथकाची सविस्तर चर्चा सुरु आहे. मात्र चार तासापासून सुरू असलेल्या चर्चेतून काय निष्पन्न झालं हे अद्याप अस्पष्ट आहे. SIT चे प्रमुख बसवराज तेली गेल्यानंतर ही संपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. अजूनही शासकीय विश्रामगृहात चर्चा सुरूच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पुण्यात येत्या 5 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा

दरम्यान, या प्रकरणात मृतक संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विरोधकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी तपास यंत्रणा आणि सरकारवर मोठा दबाव आणला आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन त्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात आहे. या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून पुण्यात येत्या 5 जानेवारीला रविवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची आणि संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.