AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | ‘आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना…’ सक्षणा सलगर यांचा जोरदार हल्लाबोल

Sharad Pawar | हे रणांगण आहे. या रणांगणात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण का भारवला आहे? 65 वर्षाचा सह्याद्री आम्ही असा तसा रिटायर होऊ देणार नाही" असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

Sharad Pawar | 'आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना...' सक्षणा सलगर यांचा जोरदार हल्लाबोल
sakshna salgar
| Updated on: Aug 17, 2023 | 3:50 PM
Share

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसची आज बीडमध्ये सभा सुरु आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सक्षणा सलगर यांनी आक्रमक भाषण केलं. “आज ऐतिहासिक अशी सभा बीड जिल्ह्यात होत आहे. मी लहानपणापासून ऐकलय पवारसाहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा. सगळे पवारसाहेबांच वय काढतात, पण एका कवीने लिहून ठेवलय की, “आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विचार बाकी आहे” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

“पवार साहेब आम्ही तरुण मंडळी आहोत. हे रणांगण आहे. या रणांगणात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण का भारवला आहे? 65 वर्षाचा सह्याद्री आम्ही असा तसा रिटायर होऊ देणार नाही” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

‘भलेभले हबाडा घेऊन घरी बसणार’

“जे फलक लावतायात ना आमच्या माणसाला साथ द्या, आमचा माणूस कामाचा, आता कामाचा माणूस की लबाड हे जनता ठरवेल. लबाडाला हबाडा बीड जिल्हा देणार. भलेभले हबाडा घेऊन घरी बसणार आहेत, हे सांगण्यासाठी ही सभा आहे” असं सक्षणा सलगर यांनी सांगितलं.

गुजरात महाराष्ट्राला चालवू शकत नाही

“भाजपाला मला सांगायच आहे की, आजपर्यंत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत होता. त्या सगळ्या लोकांना घेऊन स्वच्छ करुन टाकलत. सबकी पसंद भाजप असं झालय. पण मी एक गोष्ट सांगते, गुजरात महाराष्ट्राला चालवत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही. आमचा सह्याद्री अजून जिवंत आहे. दिल्लीला धडकण्याची ताकत महाराष्ट्राला शिवरायांनी, आंबेडकर, शाहू -फुलेंनी दिलीय” असं सक्षणा सलगर म्हणाल्या. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही

“निवडणूका येतात जातात, महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांना धडा शिकवला, तसाच महाराष्ट्र हा वीरांचा-शूरांचा आहे. या मातीतील माणूस कणखर आहे. हा स्वाभिमान, अस्मिता जपण्यासाठी पवारांना संधी द्यायची आहे” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.