AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीच्या बहीण-भावानं माझ्याविरोधात षडयंत्र रचलं… आमदार प्रकाश सोळंके यांचा तो मोठा आरोप… बीडचे राजकारण पुन्हा ढवळले

MLA Prakash Solanke Big Allegation: परळीच्या बहीण-भावानं माझ्याविरोधात षडयंत्र रचलं असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे. त्यांच्या या ताज्या आरोपांमुळे बीडचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे.

परळीच्या बहीण-भावानं माझ्याविरोधात षडयंत्र रचलं... आमदार प्रकाश सोळंके यांचा तो मोठा आरोप... बीडचे राजकारण पुन्हा ढवळले
आमदार प्रकाश सोळंके
| Updated on: Jun 14, 2026 | 1:09 PM
Share

अशोक काळकुटे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : बीडमध्ये राजकारण पुन्हा तापले आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी परळीच्या बहीण-भावानं माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप करत त्यांनी (MLA Prakash Solanke Big Allegation )खळबळ उडवून दिली. त्यांनी आपल्याविरोधात या दोघांनी काय काय केले याचा पाढाचा वाचला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आणि नंतरही प्रकाशदादा सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. काल एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पुन्हा दोघेंचे नाव न घेता तोफ डागली.

ओबीसी उमेदवार उभे केले

विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्याच नाही तर बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये ओबीसी उमेदवार उभे केले गेले.गेवराई, आष्टी, माजलगाव मध्ये, त्याचा उद्देश एवढाच होता की आमचा पराभव करायचा. कारण आम्ही मराठा आंदोलनाला, मराठ्यांच्या मागण्याला उघडपणे पाठिंबा दिला होता हे एक कारण असावं. आणि लोकसभेमध्ये पंकजाताईंचा झालेला पराभव हे देखील कारण असावं. लोक विरोधात असताना लोकसभेमध्ये माझ्या मतदारसंघांमध्ये पंकजाताईंना 1000 मतांचं लीड दिलं. माझ्या विरोधात तर एक मराठ्याचा आणि ओबीसींचे दोन उमेदवार उभे केले गेले. मला निवडून येण्यामध्ये अडचणी याव्यात या दृष्टिकोनातून षडयंत्र रचलं गेलं. परळीच्या दोघा बहीण-भावांनी षडयंत्र रचलं, असा गंभीर आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.

रोहित पवार यांच्या आंदोलनावर टीका

सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे त्यांचं स्वागत करावं तेवढं कमी आहे. दोन लाखापर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये अटी, शर्थी आहेत त्या अजून जाहीर झालेल्या नाहीत. 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी होत आहे. याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. रोहित दादांना मी समजावून सांगावं असं नाही. पण दोन लाखांचा फायदा होणार आहे. काहीतरी व्यंग काढायचं, काहीतरी कमीपणा दाखवायचा आणि स्वत:चं राजकीय नेतृत्व पुढे न्यायचं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही, अशी टीका प्रकाश सोळंके यांनी केली .

ओमप्रकाश शेटे यांच्यावर नाराजी

ओमप्रकाश शेटे सर्रास पदाचा गैरवापर करतात, नाही त्या गोष्टींमध्ये नाक खुपसतात याचा अनुभव मी घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि बावनकुळे यांच्याकडे त्यांनी अपक्ष उमेदवारांचा प्रचार केलेला पुरावा दिलेला आहे. परंतु त्यांच्या हस्तक्षेपाच्या बाबतीत अजून तक्रार केलेली नाही मी माझ्या परीने त्यांचा हस्तक्षेप थांबवण्याचा प्रयत्न करतोय असे आमदार सोळंके म्हणाले.

Follow Us
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार