AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : रखडलेला नगर-बीड रेल्वे मार्ग लागणार मार्गी..! 150 कोटींचा निधी वितरीत होताच पंकजा मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार

नगर-परळी रेल्वेमार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु झालेले आहे. असे असताना आतापर्यंत केवळ आष्टीपर्यंत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. कामामध्ये सातत्य न राहिल्याने टप्प्याटप्प्याने काम होत आहे. शिवाय रेल्वे मार्गाच्या श्रेयवादावरुनही हा मुद्दा कायम चर्चेत राहिलेला होता. असे असले तीन महिन्यापूर्वीच नगर ते आष्टी पर्यंतची ट्रायलही यशस्वी झाली होती.

Beed : रखडलेला नगर-बीड रेल्वे मार्ग लागणार मार्गी..! 150 कोटींचा निधी वितरीत होताच पंकजा मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार
रेल्वेरुळImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 10:08 PM
Share

बीड : गेल्या अनेक दिवसांपासून  (Railway Line) अहमदनगर-बीड ह्या रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. मध्यंतरी नगरपासून (Beed) बीड जिल्ह्यातील आष्टीपर्यंत ट्रायलही घेण्यात आली होती. असे असले तरी या रेल्वेमार्गाचे काम हे धिम्या गतीनेच सुरु आहे. मात्र, आता राज्य सरकारने त्यांच्या वाट्याचे 150 कोटी वितरीत केले आहेत. त्यामुळे रखडलेले काम आता अधिक गतीने होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. (State Government) राज्य सरकारने 150 कोटीचा निधी वितरीत केल्याने माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. एवढेच नाहीतर याबद्दल बीड जिल्ह्याचे अभिनंदनही त्यांनी केले आहे.

बीडकरांचे स्वप्न उतरणार सत्यामध्ये

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही बीडमध्ये रेल्वे जाळे झालेले नाही. बीडमधून रेल्वे धावावी ही प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून अहमदनगर-बीड या रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे बीडकरांच्या आशा पल्लवीत झाल्या असून सरकारच्या धोरणावर या रेल्वे मार्गाचे काम अवलंबून राहिले आहे. मात्र, शिंदे सरकारने आता या मार्गासाठी 150 कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे रखडलेले काम मार्गी लागणार आहे.

आष्टीपर्यंत काम पूर्ण अन् चाचण्या यशस्वी

नगर-परळी रेल्वेमार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु झालेले आहे. असे असताना आतापर्यंत केवळ आष्टीपर्यंत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. कामामध्ये सातत्य न राहिल्याने टप्प्याटप्प्याने काम होत आहे. शिवाय रेल्वे मार्गाच्या श्रेयवादावरुनही हा मुद्दा कायम चर्चेत राहिलेला होता. असे असले तीन महिन्यापूर्वीच नगर ते आष्टी पर्यंतची ट्रायलही यशस्वी झाली होती. त्यामुळे काम जलद गतीने होईल अशी अपेक्षा प्रत्येक बीडकराकडून केली जात आहे. पण आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार हे देखील महत्वाचे आहे.

काय म्हणाल्या आहेत पंकजा मुंडे?

नगर-परळी या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने आपल्या वाट्यातील तब्बल 150 कोटी रुपये वितरीत केले आहेत. त्यामुळे आता रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने कामाला गती मिळेल असा आशावाद आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आभार त्यांनी मानले आहेत तर बीडकरांचे अभिनंदनही केले आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.