AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मी मॅनेज होईल का ?” मराठा संघटनांच्या समन्वयकांना संभाजी छत्रपतींचा परखड सवाल

"माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत. मी मॅनेज होईल का ?" असे संभाजी छत्रपती यांनी मराठा संघटनांच्या समन्वयकांना केला आहे

माझ्यावर छत्रपतींचे संस्कार,  मी मॅनेज होईल का ? मराठा संघटनांच्या समन्वयकांना संभाजी छत्रपतींचा परखड सवाल
sambhaji chhatrapati
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 8:47 PM
Share

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या नाशिकमधील मराठा मूक आंदोलनानंतर खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chatati) यांनी सरकारला 21 दिवसांची मुदत दिलीय. संभाजी छत्रपती यांच्या या भूमिकेवर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. त्यानंतर त्यांनी परखड सवाल केला आहे. “माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत. मी मॅनेज होईल का ?” असे संभाजी छत्रपती यांनी मराठा संघटनांच्या समन्वयकांना विचारले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. (belongs to Chhatrapati family how I could be manage question asked by Sambhaji Chatati to Maratha Coordinator)

मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. खासदार संभाजी छत्रपती आरक्षण तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांचा पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी त्यांची राज्य सरकारसोबत चर्चासुद्धा सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या तसेच अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यभर मूक आंदोलन करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. नंतर नाशिकमधील मूक आंदोलनांतर त्यांनी राज्य सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिली होती. तसेच आंदोलन काही काळासाठी स्थगित केले.

त्यांच्या याच भूमिकेवर मराठा समाजाचे काही नेते तसेच संघटना यांनी प्रश्वचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनी उत्तर दिले आहे. माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत. मी मॅनेज होईल असं वाटतं का असा सवाल संभाजी छत्रपती यांनी त्यांच्यावर शंका घेणाऱ्यांवर केला आहे.

बीड आणि औरंगाबादेतही बैठक

आज कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांशी झालेल्या बैठकीत संभाजी छत्रपती यांनी अनेक मुद्द्यांवरील आपली भूमिका स्पष्ट केली. सध्याची कोरोना स्थिती आणि राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची घेतलेली दखल यामुळे संभाजी छत्रपती यांनी राज्यातील मूक मोर्चांचे सत्र तूर्तास थांबवलेले आहे. मात्र, आंदोलन थांबवलेले असले तरी राज्यात ठिकठिकाणी बैठका सुरुच असतील असे त्यांनी यापूर्वी सांगितलेले आहे. यावर बोलताना “सरकार सोबत माझी काय चर्चा झाली; हे समाजाला कळणे गरजेचं आहे म्हणूनच आजची बैठक झाली. सरकारकडे कोणते पर्याय आहेत तेदेखील समाजाला आजच्या बैठकीत सांगितले. अशाच प्रकारची बैठक बीड आणि औरंगाबादमध्ये देखील घेणार आहे,” असे संभाजी छत्रपती म्हणाले.

माझा प्रयत्न कोल्हापूरसाठी नाही तर समाजासाठी

तसेच यावेळी बोलताना त्यांनी सारथीविषयी भाष्य केलं. “सारथीचे उपकेंद्र फक्त कोल्हापूरसाठी नाही. येत्या काही दिवसांत सारथीचे उपकेंद्रे अन्य टिकाणी देखील होतील. माझा प्रयत्न फक्त कोल्हापूरसाठी नाही तर पूर्ण समाजासाठी असतो,” असं भाष्य संभाजी छत्रपती यांनी केलं.

इतर बातम्या :

आंदोलन करू नका हे सांगू शकत नाही, मात्र परिणामाचे भान राखणे गरजेचे, संभाजी छत्रपतींचं मोठं विधान

VIDEO: “मी भुजबळ यांच्या विरोधात नाही, कुणाला वाईट वाटले असेल तर माफी मागतो”

मी गोपीनाथ मुंडेंचा शिष्य, पंकजांना वडेट्टीवार म्हणतात, आपण गुरुबंधू, वाचा ओबीसी परिषदेत काय घडतंय?

(belongs to Chhatrapati family how I could be manage question asked by Sambhaji Chatati to Maratha Coordinator)

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...