AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भैय्याजी जोशींचं वादग्रस्त विधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेटच प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रात राहणाऱ्या…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या मुंबईतील मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. जोशी यांनी मुंबईची भाषा एकच नाही असे म्हटले. शिवसेना ठाकरे गटानेही यावरून सरकारला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर थेट प्रतिक्रिया देत शासनाची भूमिका स्पष्ट केली.

भैय्याजी जोशींचं वादग्रस्त विधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेटच प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रात राहणाऱ्या...
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Mar 06, 2025 | 12:52 PM
Share

मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्यांनी नवा वाद पेटला आहे. “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात.” असे वक्तव्य भैय्याजी यांनी केले होते. मात्र यावरूनच वाद पेटला असून संजय राऊतांसह विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. या वक्तव्यावर सरकारची भूमिका काय आहे, ते स्पष्ट करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी विधानसबेत केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

भय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते पूर्णपणे ऐकून, माहिती घेऊन मी बोलेन.पण सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची , महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्यात, त्या संदर्भात भय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषाही मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कोणत्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणूनच शआसनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी केला.

काय आहे प्रकरण ?

मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी मुक्ताफळं उधळली. ते घाटकोपर येथील एका कार्यक्रमात मुंबईच्या भाषिक वैशिष्ट्यावर बोलत होते.  “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असं वक्तव्य करून त्यांनी वाद ओढावून घेतला.

Follow Us
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या