AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयात दगावलेल्या बाळांच्या आईची भोजापूर इथं जात भेट घेतली.

Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jan 10, 2021 | 2:57 PM
Share

भंडारा: जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयात दगावलेल्या बाळांच्या आईची भोजापूर इथं जात भेट घेतली. त्यावेळी आपण हात जोडून उभं राहण्यापलीकडे काही करु शकलो नाही, अशी खंतही ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.(Uddhav Thackeray’s visit to Bhandara District Hospital)

पीडित कुटुंबियांचं सांत्वन करुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “ही दुर्घटना आम्ही गांभीर्यानं घेतली आहे. मी, विधानसभा अध्यक्ष आणि मंत्री येथे आलो आहोत. पीडित कुटुंबासमोर हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडं पर्याय नव्हता. कोरोनाचा सामना करताना इतर गोष्टींकडे डोळेझाक केली गेली का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी केली जाईल. जे काही सत्य आहे ते बाहेर येईल या घटनेला जो जबाबदार असेल तो सुटणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

चौकशी समिती गठीत – मुख्यमंत्री

तसंच भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. विभागीय आयुक्तांना त्याबाबत आदेश दिले आहेत. मुंबईतून अग्निशमन दलाचे प्रमुख राम दळे त्यांचीही नेमणुक या टीममध्ये करण्यात आली आहे, कुठेही कसर राहणार नाही, सत्या पुढे येईल आणि त्यात जर कुणी जबाबदार आढळून आलं तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर या दुर्घटनेनंतर राज्यात पुन्हा अशी दु:खद घटना घडू नये यासाठी राज्यातील सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे आदेश दिल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- फडणवीस

भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाल्यांनतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत त्याची तत्काळ चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केली आहे. तसंच या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेली ही दुर्घटना म्हणजे महाराष्ट्रासाठी काळा दिवस असल्याचंही फडणवीस म्हणाले होते.

..तर ती बाळं वाचली असती!

भंडारा जिल्हा रुग्णालयात फायर सेफ्टी उपकरणांबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पण त्याबाबत गेल्या 6 ते 7 महिन्यांत आरोग्य विभागाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. जर याबाबत योग्य वेळी निर्णय झाला असता आणि रुग्णालयात फायर सेफ्टी उपकरणं बसवण्यात आली असती तर त्या 10 चिमुकल्यांचा जीव वाचले असते, असं मत विविध स्तरातून व्यक्त केलं जात आहे.

संबंधित बातम्या:

Bhandara Hospital Fire | 10 नवजात बालकांचा मृत्यू, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे?

Bhandara District hospital fire | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

Uddhav Thackeray’s visit to Bhandara District Hospital

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.