Bhandara Fire News LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या भंडारा जिल्ह्यात, दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार

| Updated on: Apr 15, 2021 | 3:27 PM

Bhandara District hospital fire Live news and updates : भंडाऱ्यात शिशु केअर युनिटच्या आगीत 10 बाळांचा होरपळून मृत्यू झाला.

Bhandara Fire News LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या भंडारा जिल्ह्यात, दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार
BHANDAR Fire

Bhandara hospital fire : भंडारा इथं सरकारी रुग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव झालं. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Jan 2021 10:55 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या भंडारा जिल्ह्यात, दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दुपारी 12 वाजता भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहाणी करणार, तसेच नवजात बालक गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देणार

  • 09 Jan 2021 06:17 PM (IST)

    कुडाळ तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

    कुडाळ तालुक्याच्या कसाल, पडवे, रानबांबुळी आणि ओरोस परीसरात आज संध्याकाळी अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली. गेले चार ते पाच दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे.  या पावसामुळे आंबा आणि काजू पिकावर परीणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकरी माञ चिंतेत सापडला आहे.

  • 09 Jan 2021 05:58 PM (IST)

    सरकार खोलात जाऊन चौकशी करेल : रोहित पवार

    भंडारा दुर्घटनेप्रकरणी सरकार खोलात जाईल, यामध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई व्हावी अशी माझी मागणी, आणि यापुढे असा हलगर्जीपणा होणार नाही याकडे बघावं, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.

  • 09 Jan 2021 04:40 PM (IST)

    देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण

    देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने याबाबतची घोषणा केली आहे. या वृत्ताला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला. आरोग्य सेवक आणि कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांवरील व्यक्तींना ही लस दिली जाईल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीकरणाबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय बैठक गेतली. या बैठकीत लसीकरणाच्या तयारीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. या बैठकीला कॅबिनेट सेक्रेटरी, आरोग्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज

    दरम्यान, 16 जानेवारीपासून होणाऱ्या कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. “लसीकरणाची संपूर्ण तयारी राज्यात झाली आहे, ज्या क्षणाला केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून देईल आम्ही लसीकरण सुरू करू. कोल्डचेनही तयार आहे, काही कमतरता आहे ती दूर करु. पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्यसेवकांना लस देऊ” असं राजेश टोपे म्हणाले.

  • 09 Jan 2021 04:20 PM (IST)

    वॉर्डमध्ये जाऊन राजेश टोपेंकडून आढावा, चौकशीसाठी 6 सदस्यांची समिती

    भंडारा आगीची घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ८ मुली आणि २ मुलं अशी दहा बालकं दगावली. निष्पाप बालकं गेली. ही बालकं बाहेर जन्मली होती, मात्र जन्मत: कमी वजन आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा अशी ही बालकं होती, त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री शॉर्ट सर्किटने स्पार्क झाला आणि अचानक स्फोट झाला. काळ्या धुरामुळे काहीही दिसत नव्हतं. हा धूर बालकांच्या वॉर्डमध्येही घुसला. सात बालकांना वाचवण्यात यश आलं..

    या घटनेची चौकशी करण्यासाठी साधना तायडे यांच्या नेतृत्त्वात समिती तयार केली आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ आहेत. सहा लोकांची समिती या घटनेची चौकशी करेल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

    झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व रुग्णालयांना खबरदारीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा जो रिपोर्ट येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्याच्या उद्या मदत पोहोचवली जाईल. आमच्या सहवेदना कुटुंबीयांसोबत आहेत. मातांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहोत, असं राजेश टोपे म्हणाले.

  • 09 Jan 2021 03:13 PM (IST)

    निष्काळजीपणा झाला असेल तर शिक्षा झालीच पाहिजे : राजेश टोपे

    आम्ही घटना स्थळाला भेट द्यायला जातो आहोत. घटना अतिशय दुर्दुवी आहे , हृदयाला पिळवटणारी घटना आहे. बऱ्याच जणांच्या डेड बॉडी त्यांच्या परिवाराला देण्यात आल्या आहे , काहींवर अंतिम संस्कार सुद्धा झालेले आहेत. मृतकांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. याची चौकशी डिटेलमध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या, त्यासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, शॉर्ट सर्किट कसं झालं याची सगळी माहिती घेतली जात आहे. निष्काळजीपणा यात झाला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अशा घटना यापुढे घडणार नाही यासाठी सगळे ऑडिट केलं जाणार आहे. आम्ही त्या परिवारांना भेटून सांत्वन देण्याचा प्रयत्न करू. या घटनेतून खूप काही शिकण्यासारखं आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

  • 09 Jan 2021 12:45 PM (IST)

    भंडारा आगीचा चौकशी अहवाल 48 तासात सादर करा, राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे निर्देश

    भंडारा दुर्घटनेची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाकडून दखल, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश, 48 तासात रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश

  • 09 Jan 2021 12:43 PM (IST)

    भंडारा आगप्रकरणात जो दोषी असेल, त्याला कडक शासन केलं जाईल : अजित पवार

    भंडारा आगप्रकरणात जो दोषी असेल, त्याला कडक शासन केलं जाईल. या दुर्घटनेची बारकाईने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्री घटनास्थळी पोहोचतील, तिथूनही अधिक माहिती मिळेल. स्वत: मुख्यमंत्री दुर्घटनेचा सातत्याने आढावा घेत आहेत. या दुर्घटनेबाबत मी दु:ख व्यक्त करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो – अजित पवार

  • 09 Jan 2021 12:33 PM (IST)

    भंडारा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल : गृहमंत्री

    भंडारामध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दोषी आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. याची चौकशी केली जात आहे , फायर ऑडिट झालं की नाही हे चौकशीत माहीत पडेल – गृहमंत्री अनिल देशमुख

  • 09 Jan 2021 11:41 AM (IST)

    ICU मध्ये दहा बालकांचा मृत्यू होणं लाजिरवाणं, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना : फडणवीस

    भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक, प्रगतीशील महाराष्ट्रात 10 नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे. फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचं नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस नागपुरातून भंडाऱ्याकडे निघाले आहेत. तिथे ते घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

  • 09 Jan 2021 11:07 AM (IST)

    10 बालकांचा मृत्यू नव्हे तर हत्या, राम कदमांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

    राज्य सरकार आणि प्रशासन यांच्या निष्कळजीपणामुळे याआधी सुद्धा अनेक लोकांचं मृत्यू रुग्णालयात झालेले आहेत. या 10 बालकांचा मृत्यू झाला ही हत्या आहे. सरकार असा निष्कळजीपणा किती दिवस करणार आहे

  • 09 Jan 2021 11:05 AM (IST)

    सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे : रोहित पवार

    रोहित पवार यांची प्रतिक्रिया

    भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबियांवर हे दुःख कोसळलं त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

  • 09 Jan 2021 10:44 AM (IST)

    भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दु:ख

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

  • 09 Jan 2021 10:39 AM (IST)

    VIDEO : देशाला हादरवून सोडणाऱ्या भंडारा आगीचा व्हिडीओ

  • 09 Jan 2021 10:32 AM (IST)

    “भंडारा आगीची सखोल चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”

    भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात १० नवजात बालकांचा मृत्यू झालाय, याची सखोल चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

  • 09 Jan 2021 10:31 AM (IST)

    भंडारा पोलिसांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश, गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळाला भेट देणार

    भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश भंडारा पोलिसांना दिले आहेत. तसेच ते आज स्व:त  घटनास्थळी भेट देणार आहे.

  • 09 Jan 2021 09:59 AM (IST)

    राज्यातील सर्व रुग्णालयांचे तत्काळ ऑडीट करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

    मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयांतील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्यात येईल असे पवार यांनी सांगितले आहे. तसेच अन्य बालकांवरील उपचार सर्व देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

  • 09 Jan 2021 09:52 AM (IST)

    महाराष्ट्र सरकारने सर्व मदत पुरवावी, राहुल गांधींची राज्य सरकारला विनंती

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधीनी भंडारा येथील नवजात बालकांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र सरकारला आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याची विनंती त्यांनी केली आहे.

  • 09 Jan 2021 09:46 AM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार घटनास्थळाला भेट देणार

    भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार घटनास्थळाला भेट देणार आहेत. ते भंडारा जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत. दीड तासांमध्ये ते भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचतील.

  • 09 Jan 2021 09:41 AM (IST)

    चौकशीचे आदेश दिले आहेत : राजेश टोपे

    नवजात बालक ठेवण्यात आले होते त्या वर्डात आग लागली. सबंध वॉर्डामध्ये धूर जमा झाला होता. सर्व बालकांना हलवण्यात यश आलं. यामुळे 10 बालकांचा मृत्यू झाला.

    दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार

    चौकशी केल्यानंतर योग्य करावाई करण्यात येईल.

    मृत बालकांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत जाहीर केली आहे.

  • 09 Jan 2021 09:40 AM (IST)

    घटनेची तत्काळ चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा : देवेंद्र फडणवीस

    भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

  • 09 Jan 2021 09:29 AM (IST)

    भंडारा य़ेथील घटना अतिशय विदारक, कुटुंबाच्या दु:खात सहभागी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

    भंडारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात जी दुर्घटना झाली. ती अतीशय दुखद असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाल आहेत. त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. ट्विट करुन त्यांनी कुंटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

Published On - Jan 09,2021 10:55 PM

Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.