Bhandara ZP | सुनील मेंढे-चरण वाघमारे यांच्यात फेसबूक वॉर; नाना पटोलेंची चरण वाघमारेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर माजी आमदार चरण वाघमारे यांनी भाजपची साथ सोडली. आता चरण वाघमारे आणि खासदार सुनील मेंढे यांच्यात फेसबुक वार सुरू झालंय. चरण वाघमारे आणि खासदार सुनील मेंढे यांच्यात फेसबुकच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत.

Bhandara ZP | सुनील मेंढे-चरण वाघमारे यांच्यात फेसबूक वॉर; नाना पटोलेंची चरण वाघमारेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर
माजी आमदार चरण वाघमारे, खासदार सुनील मेंढे यांच्यात फेसबूक वॉर.Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 10:27 AM

भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा एक गट फुटला. भाजपची झालेली हार भाजपला जिव्हारी लागली. आपल्यासोबत दगा झाल्याचा भाव दोन्ही गट फेसबूकच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. काल भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे (MP Sunil Mendhe) यांनी भाजपमधून निलंबित माजी आमदार चरण वाघमारे (Former MLA Charan Waghmare) यांनी दगा केला. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करणारे नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांच्यासोबत सत्तेत जाण्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी चरण वाघमारे यांना निलंबित केल्याचे फेसबुकवर जाहीर केले. त्यानंतर सुनील मेंढे यांच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करत चरण वाघमारे आपली नाराजी व्यक्त केली. भाजपचे राष्ट्रावादी प्रेम उफाळून आल्याची टीकाही त्यांनी केली. दोन नेत्यांच्या या फेसबुक वारमध्ये एकमेकांचे कार्यकर्ते ही भिडले. एकमेकांच्या नेत्यांवर आगडपाखड सुरू झाली. विशेष म्हणजे निलंबित माजी आमदार चरण वाघमारे यांच्या समर्थनात काँग्रेसही उरतल्याची दिसते.

पटोलेंची वाघमारेना काँग्रेमध्ये येण्याची ऑफर

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर माजी आमदार चरण वाघमारे यांनी भाजपची साथ सोडली. आता चरण वाघमारे आणि खासदार सुनील मेंढे यांच्यात फेसबुक वार सुरू झालंय. चरण वाघमारे आणि खासदार सुनील मेंढे यांच्यात फेसबुकच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपचा फैरी सुरू आहेत. दरम्यान, चरण वाघमारे यांनी काँग्रेसला मदत केली. त्यामुळं काँग्रेसनं जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाघमारे यांनी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली. आम्हाला चरण वाघमारे सारखा विकास पुरुष मिळेल, असेही नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

चरण वाघमारे म्हणतात, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करू

कार्यकर्त्यांसोबत विचारमंथन करून पुढील भूमिका ठरवू असे चरण वाघमारे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या जिल्हा परिषदेत अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला समर्थन करत सत्ता स्थापनेचा भाजपपक्षश्रेष्ठींचा आदेश चरण वाघमारे यांनी झुगारला. काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळं काँग्रेसचा अध्यक्ष तर तर भाजप फुटीर गटाचा उपाध्यक्ष बनला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.