पुन्हा “मोदी”वरून खडाखडी, हायकमांडने झापल्यानंतर नानांनी तयार केला कथित मोदी :- खासदार सुनील मेंढे

पुन्हा मोदीवरून खडाखडी, हायकमांडने झापल्यानंतर नानांनी तयार केला कथित मोदी :- खासदार सुनील मेंढे
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नाना पटोले

कांग्रेस हायकमांड ने झापल्यानंतर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कथित मोदी नावाचा गाव गुंड तयार करून पत्रकारांसमोर उभा केल्याच्या आरोप भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे.

शाहिद पठाण

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 22, 2022 | 5:40 PM

भंडारा : काही दिवसांपूर्वीच नाना पटोलेंच्या (Nana Patole) एका वक्तव्यावरून जोरदार गदारोळ सुरू आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांबद्दल (Pm Modi) नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. भाजपने (Bjp) शंभरहून अधिक ठिकाणी नाना पटोलेंविरोधात तक्रारीही दाखल केल्या. नाना पटोलेंनी मात्र मी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्याबाबत बोललो नसल्याचे सांगत, मी तर मोदी नावाच्या गावगुंडाबाबत बोललो असल्याचे सांगितले. त्यानंतर शोध सूर झाला त्या मोदीचा आणि आता तो समोरही आला. मात्र कांग्रेस हायकमांड ने झापल्यानंतर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कथित मोदी नावाचा गाव गुंड तयार करून पत्रकारांसमोर उभा केल्याच्या आरोप भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे.

नाना पटोले दिशाभूल करत आहेत

या संपूर्ण प्रकरणात दिशाभूल करण्यासाठी नाना पटोलेंचा हा केविलवाला प्रकार असल्याचे मेंढे यांनी वक्तव्य केले आहे. ह्यावेळी संबधित मोदी नामक व्यक्तिवर पूर्वी व आता कोणतेही गुन्हे दाखल नसताना त्या व्यक्तीला मीडिया सामोर आणल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले आहे. यावेळी शासनाच्या दबावात भंडारा पोलीस असून नाना पटोले यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप मेंढे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

तो मोदी नेमका कोण?

टीव्ही9 मराठीशी या कथित मोदीने संवादही साधला आहे. माझी पत्नी सोडून गेली. म्हणून गावातले लोक मला मोदी म्हणतात. मी दारुचा व्यवसाय करतो. मी गावगुंड आहे, असं या व्यक्तीने म्हटलं आहे. उमेश घरडे असं या व्यक्तीचं नाव आहे. मीडियासमोर येऊन घरडे याने आपणच गावगुंड असून आपल्याला लोक मोदी संबोधत असल्याचं म्हटलं आहे. माझी पत्नी सोडून गेली म्हणून मला गावातले लोक मोदी बोलतात. मी दारुचा व्यवसाय करतो, गावगुंड आहे, आपण कुणाला घाबरत नाही, असं घरडे याने म्हटलं आहे. या मोदीचं मूळ नाव उमेश घरडे ऊर्फ मोदी असं आहे. आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असंही त्याने सांगितलं. यात कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हेही समोर येईलच मात्र, सध्या तरी हे प्रकरण शांत होण्याचे नाव घेत नाहीये.

VIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं, आम्हाला संविधान वाचवायचं आहे-पृथ्वीराज चव्हाण

मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ शिवसेना जबाबदार; काँग्रेस नेते संजय निरुपम यांचे तोंडसुख

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें