AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भास्कर जाधव यांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचले,स्टेटस ठेवल्याने नवा वाद

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि गुहागर ब्राह्मण संघात वाद पेटला आहे. भास्कर जाधव यांनी आज पुन्हा साने चित्रपटातील एका संवादाचे स्टेटस ठेवत ब्राह्मण समाजाला डिवचले आहे.

भास्कर जाधव यांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचले,स्टेटस ठेवल्याने नवा वाद
bhaskar jadhav
| Updated on: Aug 13, 2025 | 10:09 PM
Share

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यात आणि गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघात कलगीतुरा लागला आहे. भास्कर जाधव यांनी मुंबईतील मेळाव्यात ब्राह्मण सहाय्यक संघ नेत्यांवर टोकाची टीका केली होती. ब्राह्मण सहाय्यक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनश्याम जोशी यांना बेडकाची उपमा दिली होती. आता भास्कर जाधव यांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचणारे स्टेटस ठेवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी साने गुरुजी चित्रपटातील स्टेटस ठेवल्याने नवा वाद झाला आहे.

साने गुरुजींचा व्हिडिओचे स्टेटस पाहा –

आमदार भास्कर जाधव यांच्यात आणि गुहागर येथील ब्राह्मण सहाय्यक संघात वाद सुरु आहेत. भास्कर जाधव यांनी आज एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवत ब्राह्मण समाजाला डिवचले आहे. साने गुरुजी चित्रपटातील एक संवाद त्यांनी आपल्या मोबाईल व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातले आरमार पेशव्यांनी पडल्याचा दावा करणारा साने गुरुजींचा व्हिडिओ त्यांनी व्हॉट्स अँप स्टेटसवर ठेवत पुन्हा ब्राम्हण समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

इंग्रज सरकारशी हात मिळवणी करीत पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंग्रे यांनी सांभाळून ठेवलेले आरमार पाडल्याचा दावा केला आहे.पेशव्यांनी केलेलं कृत्य साने गुरुजी यांनी चित्रपटात मांडल्याचा व्हिडिओ उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. भास्कर जाधव यांच्या स्टेट्समुळे ब्राम्हण समाजाच्या विरोधातील नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणूकीत माझा पराभव करण्यासाठी बौद्ध समाजाला माझ्याविरोधात केले गेले. वंचित आघाडीचे नेते अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला त्यात माझे नाव गोवले गेले. ठाण्यातील त्या नेत्यालाही मी सोडणार नाही.घनशाम जोशी यांनी पक्ष म्हणून पत्र लिहिले असते तरी काही वाटलं नसतं. पण समाज म्हणून पत्र लिहीलं याचे वाईट वाटते असे भास्कर जाधव यांनी मुंबईतील मेळाव्यात टीका केली होती.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.