AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंची आता बॉलिवूडच्या शूटिंग स्थळांवर नजर; राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या निवेदनात काय?

राज्यभरातील चित्रपट, मालिका यांच्या चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची तुकाराम मुंढे यांच्याकडे धाव.

तुकाराम मुंढेंची आता बॉलिवूडच्या शूटिंग स्थळांवर नजर; राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या निवेदनात काय?
| Updated on: Jul 31, 2026 | 2:34 PM
Share

राज्यभरातील चित्रपट, मालिका यांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.

चित्रीकरणाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पौष्टिक आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे तसेच अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या प्रमुख उद्देशाने ही भेट घेण्यात आली.

तुकाराम मुंढेंसोबत नेमकी काय चर्चा?

बैठकीदरम्यान राज्यातील विविध चित्रीकरण स्थळांवर पुरविण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. अन्न तयार करण्यापासून ते साठवणूक, वाहतूक आणि वितरणापर्यंतच्या प्रक्रियेत स्वच्छतेचे पालन, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, अन्नसुरक्षा नियमांचे पालन तसेच उत्पादन संस्था आणि केटरिंग सेवा पुरवठादारांच्या जबाबदाऱ्यांवर सखोल चर्चा झाली.

शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यामध्ये राज्यातील चित्रीकरण स्थळांवर विशेष तपासणी मोहीम राबविणे, अन्नाच्या गुणवत्तेची नियमित प्रयोगशाळीय तपासणी करणे, निकृष्ट किंवा अस्वच्छ अन्न पुरविणाऱ्या संबंधित संस्था व केटरर्सवर कठोर कारवाई करणे, चित्रीकरण स्थळांसाठी स्वतंत्र अन्नसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आणि कलाकार व तंत्रज्ञांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नियमित निरीक्षण यंत्रणा कार्यान्वित करणे, या मागण्यांचा समावेश होता.

शिष्टमंडळाच्या सर्व मुद्यांची दखल

अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांनी शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील आठवड्यात आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि अन्नसुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा निर्माते नितीन धावणे, प्रदेश सरचिटणीस तथा अभिनेत्री अपेक्षा चव्हाण, अभिनेते मिलिंद दास्ताने, अभिनेते सुनील पगार, दिग्दर्शक शिरीष राणे, निर्माते चंद्रकांत विसपुते आणि मराठी चित्रपट वितरक अजय फुटाणे यांचा समावेश होता.

Follow Us
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...