AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव पाठोपाठ भिवंडीत भाजपला दणका, महानगरपालिकेत कोणार्क विकास आघाडीचा वरचष्मा

कोणार्क विकास आघाडीनं सभागृह नेता कार्यभार स्वीकारण्याच्या निमित्तानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. (Bhivandi Municipal Corporation)

जळगाव पाठोपाठ भिवंडीत भाजपला दणका, महानगरपालिकेत कोणार्क विकास आघाडीचा वरचष्मा
भिवंडी महापालिका सभागृह नेता निवड
| Updated on: Mar 18, 2021 | 5:17 PM
Share

भिवंडी: भाजपला दिवसभरात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपनं जळगाव महानगरपालिकेतील सत्ता गमावली. तिथे भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपला फटका बसला. जळगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी झाल्या. दुसरीकडे भिवंडी महानगरपालिकेतही भाजपला दणका बसला आहे. भिवंडी पालिका सभागृह नेतेपदी विकास निकम यांनी पदभार स्वीकारला. भिंवडीमधील सत्ताधारी कोणार्क विकास आघाडीनं भाजपाला दणका दिला आहे. (Bhivandi Konark Vikas Aghadi Vikas Nikam is house leader of Corporation BJP losses Post)

कोणार्क विकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन

भिवंडी महानगरपालिका सभागृह नेते पदी महापौरांनी पुन्हा एकदा दिलेलं सभागृह नेते पद स्वीकारण्यास भाजपने नकार दिला. त्यामुशळे महापौरांनी अवघ्या पाच दिवसात आपला निर्णय बदलून कोणार्क विकास आघाडीमधील विकास निकम यांच्या नियुक्तीची घोषणा केली. मोठे शक्तिप्रदर्शन करत विकास निकम यांनी महापौर प्रतिभा पाटील कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख विलास पाटील यांसह नगरसेवक यांच्या उपस्थितीत सभागृह नेतेपदाचा पदभार कार्यालयात स्वीकारला. या निमित्त मोठे शक्तिप्रदर्शन कोणार्क विकास आघाडीने केले आहे .

कोणार्क विकास आघाडीचे अवघे 4 सदस्य

भिवंडी महानगरपालिका सभागृहात सत्तेत असलेल्या अवघ्या चार सदस्य असलेल्या कोणार्क विकास आघाडीस भाजपा 20 , बँडखोर काँग्रेस सदस्य 18 व अपक्ष 7 नगरसेवकांनी समर्थन दिले होते. त्यामध्ये सभागृह नेते पद भाजपच्या वाट्याला आल्या नंतर महापौर प्रतिभा पाटील यांनी भाजपाचे शाम अग्रवाल यांची नियुक्ती 16 डिसेंबर रोजी सभागृह नेतेपदी केली.परंतु त्या नंतर शाम अग्रवाल यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान महापौरां बद्दल अपशब्द वापरून अपमान केल्याने महापौरांनी ही बाब भाजपा पक्ष पदाधिकारी व गटनेते याना कळवून 12 मार्च च्या ऑनलाईन महासभेत शाम अग्रवाल यांची गच्छंती केली.

भाजपच्या कमिनी पाटील यांचा पद स्वीकारण्यास नकार

महापौर प्रतिभा पाटील यांनी भाजपच्याच नगरसेविका कमिनी पाटील यांची नियुक्ती केली होती.परंतु, त्यांनी पद स्वीकारण्यास नकार देत शाम अग्रवाल यांच्या नावाचा आग्रह धरल्याने 16 मार्च रोजी च्या विशेष अर्थसंकल्पीय महासभेत कोणार्क विकास आघाडी गटातील आरपीआय एकतावादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांची नियुक्ती 16 मार्च रोजी केली.

संबंधित बातम्या

ईडी भाजपला संपविल्याशिवाय राहणार नाही; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

“मतदारांनी भाजपला जागा दाखवली, कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित”

(Bhivandi Konark Vikas Aghadi Vikas Nikam is house leader of Corporation BJP losses Post)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.