AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे विरोधात भुजबळ झाले आक्रमक, विरोधकांनी भुजबळांवर टीका करताना भाजपकडे दाखवले बोट

एका जातीचा मुद्दा घेऊन मराठा समाजाचे बसलेले असतात. त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि महिलांना प्रचंड अमानुषपणे मारलं जातं तर मग त्या मागे कोण आहे नेमकं? अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावरून गृहमंत्री फडणवीसांवर आरोप झाले. मात्र. माहिती अधिकारामधून मोठी माहिती समोर आलीय.

जरांगे विरोधात भुजबळ झाले आक्रमक, विरोधकांनी भुजबळांवर टीका करताना भाजपकडे दाखवले बोट
CHHAGAN BHUJBAL AND MNAOJ JARANGE PATIL Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Nov 20, 2023 | 10:16 PM
Share

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : राज्यसरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, त्यावरून विरोधकांनी भुजबळांसह भाजपवरही निशाणा साधला. भाजपाच्या सांगण्यावरून भुजबळ आरक्षणावरून प्रक्षोभक बोलत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय. मंत्री भुजबळ यांची भाषा आणि टीका ही भाजपच्या सांगण्यावरून असल्याची टीका आता सुरू झाली आहे. ठकारे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या कपटनीतीला बळी पडून गावगाड्याची उसळू नये. आणि आपल्याच माणसांचं नुकसान करू नये, अशी टीका भुजबळ यांच्यावर केलीय.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही भुजबळ यांचा वापर होतोय. त्यांना blackmail केलं जातंय, तुम्ही असं बोलले नाही तर jail मध्ये टाकू. जी scrip त्यांच्या भाषणाची आहे ती कदाचित भाजप आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिहून दिली की काय अशी चर्चा सुरू आहे, असा टोला भुजबळ यांना लगावला. त्याचवेळी सुषमा अंधारे यांनी पुन्हा Facebook पोस्टसह एक फोटो पोस्ट केला. हा फोटो तुम्हाला आठवतोय ना? असं म्हणत तुम्ही कायमच संघ विचारधारेच्या विरोधात दंड थोपटले. मग, आता भाजपच्या खेळीमध्ये का अडकत आहात? असा सवाल केलाय.

राज्यात जी काही कुस्ती चाललेली आहे. त्या कुस्तीमध्ये होतंय काय? महाराष्ट्राचे प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. या सगळ्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष करण्यासाठी जर अशा नूरा कुस्त्या लावल्या जात असतील आणि त्यात OBC भावांचे आणि मराठा भावांचे जर नुकसान होत असेल तर माझी जरांगे आणि भुजबळ या दोघांनाही विनंती असेल की कृपया भाजपच्या कपटनीतीला बळी पडून गावगाड्याची उसळू नये आणि आपल्याच माणसांचं नुकसान करू नये असे आवाहनही अंधारे यांनी केलंय.

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे आणि ठकारे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही भुजबळांना टीकेसाठी भाजपाकडून ब्लॅकमेल केलं जातंय असा आरोप केलाय. भाजप पुरस्कृत जातीवाद पेरण्याची ही कला आहे. ही फार पूर्वीपासूनची महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळे भुजबळांना हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा एक याठिकाणी वापर होतोय. त्यांना ब्लॅकमेल केलं जातंय की जेलमध्ये टाकू. तुम्ही असं बोलले नाही तर मराठा समाजाच्या विरुद्ध उभे ठाका. मराठा समाजाला चेतवा, पेटवा असे बाळासाहेब सराटे म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही भुजबळ यांच्यावर टीका करताना भाजपवर निशाणा साधला आहे. आता कुणीतरी अशी धमकी दिलेली दिसतेय तुम्ही हे काही तरी अशा पद्धतीचं वक्तव्य करा. न पेक्षा तुम्ही जामिनावर बाहेर आहात. ही जाणीव ठेवा. कुणीतरी एका भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याने करुन दिलेली असल्यामुळंच अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत असा टोला जाधव यांनी लगावला आहे.

त्यावर भुजबळ यांचा पुतण्या आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी गेले तीस पस्तीस वर्ष OBC च्या संदर्भामधली आपली भूमिका भुजबळ साहेबांनी ठाम मांडली आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका बदललेली नाही. त्याच्यामध्ये RSS ची भूमिका काय आहे आणि BJP ची भूमिका काय आहे. म्हणून भुजबळ साहेबांनी भूमिका बदलली हे साफ चुकीचं आहे असे म्हटलंय. विरोधकांनी भुजबळांवर टीका करताना भाजपकडे बोट दाखवलंय. तर दुसरीकडे अंतरवाली सराटीमधील लाठीचार्ज, फडणवीसांच्या आदेशावरून झालेला नाही, अशी माहिती RTI मधून समोर आली आहे. लाठीचार्जचे आदेश गृहमंत्री फडणवीसांचे नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. मग, अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज कोणाच्या आदेशानं झाला? ते शोधायला हवं. असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.