AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात आणखी एक जमीन व्यवहार प्रकरण तापणार? बड्या नेत्याचं कनेक्शन समोर

पार्थ पवार यांच्यावर जमीन घोट्याळ्याचे आरोप झाले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे, हे प्रकरण ताजं असतानाच आता राज्यातील आणखी एका जमिनीचं प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! राज्यात आणखी एक जमीन व्यवहार प्रकरण तापणार? बड्या नेत्याचं कनेक्शन समोर
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 08, 2025 | 10:03 PM
Share

रवी गोरे, जळगाव प्रतिनिधी :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोट्याळाचा आरोप झाला आहे, पुण्यातील 1800 कोटी रुपयांची जमीन तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे, तसेच 300 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारामध्ये अवघी 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे, हे प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजत आहे. दरम्यान हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक जमीन प्रकरण तापण्याची शक्यता आहे.  भुसावळ तालुक्यातील मालपूर येथील तायडे यांच्या कुटुंबाची साधारण 20–22 वर्षांपूर्वी घेतलेली जमीन परत मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मालपूर येथे तायडे यांच्या कुटुंबाची जमीन होती, 20 ते 22 वर्षांपूर्वी या जमिनीचा व्यवहार झाला होता. मात्र आता ही  जमीन परत मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. महार वतनाच्या  जागेवर साखर कारखाना उभारण्याच्या आश्वासनावरून ही जमीन त्या काळातील राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून कवडीमोल दराने देण्यात आली होती. परंतु कारखाना सुरू न होता तायडे कुटुंबाची फसवणूक झाली असल्याचा आरोप रिपाईच्या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

आज झालेल्या निदर्शनात एकनाथ खडसे यांच्या कारभाराचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तायडे कुटुंबीयांवर झालेल्या अन्यायाची चौकशी करून बळकावलेली जमीन तात्काळ परत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. रिपाइंच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सागर घुगे यांची भेट घेऊन निवेदन देखील सादर केले आहे. जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारून विषयाची नोंद घेतली आहे. आंदोलनासाठी रिपाइंचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि तायडे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पार्थ पवार यांच प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक जमीन प्रकरण तापण्याची चिन्हं आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...