AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर मीच सांगितले असते असा व्यवहार नको? कोरेपार्क जमीन व्यवहारावर काय म्हणाले अजित पवार

या प्रकरणात रोहित पवार आणि सुप्रिया पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर जराही टीका केलेली नाही याबद्दल अजित पवार यांनी विचारले असता त्यांनी त्यांच्याशी आपले काहीही बोलणे झाले नसल्याचे ते म्हणाले. तसेच यात तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होतोय का असे विचारले असता त्यावरही असे मला वाटत नाही असे उत्तर पवार यांनी दिली.

...तर मीच सांगितले असते असा व्यवहार नको? कोरेपार्क जमीन व्यवहारावर काय म्हणाले अजित पवार
| Updated on: Nov 08, 2025 | 8:10 PM
Share

पुणे कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात एक पैशाचाही व्यवहार झालेला नाहीए. जो व्यवहार झाला आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे. आपल्यावर आता बोपोडीतील जमीन व्यवहाराचा आरोप केला जात आहे.  त्या व्यवहाराचा या व्यवहाराशी काही संबंध नाही. तरीही मीडियाने या व्यवहाराला त्या व्यवहाराशी जोडले आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करु नका जे केलेय ते दाखवा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

पुण्याच्या अत्यंत मोक्याच्या ठीकाण असलेल्या कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना विकत घेण्याच्या घोटाळा गाजत आहे. या संदर्भात अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांच्या कंपनीने ही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी अवघी ५०० कोटींची स्टँम्प ड्युटी भरली. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला. या प्रकरणात तिघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याने टीका होत आहे.

एका महिन्यात अहवाल येणार

या संदर्भात अजित पवार यांनी या प्रकरणात सांगितले की रजिस्टार कार्यालयात कागदपत्र करताना जे तिघा जणांच्या सह्या झाल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात शासनाच्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. ती या प्रकरणाचा तपास करून एक महिन्यात अहवाल देणार आहे त्यानंतर आणखी कोणी दोषी असेल तर कारवाई होईल असे अजित पवार यांनी आज सांगितले आहे.

शासनाची फसवणूक होऊ नये काळजी घेण्यात येणार

मूळात या शीतल तेजवाणी यांनी २००६ मध्ये १९ वर्षांपूर्वी या जमीनीची पॉवर ऑफ एटर्नी घेतली आहे.त्यावेळी पाच कोटीची किंमत दाखवली आहे. या प्रकरणात आता चौकशी होऊन समितीच्या अहवालानुसार कारवाई केली जाणार आहे. एडीशन चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू, पुण विभागीय महसुल आयुक्त, जिल्हाधिकारी, जमाव बंदी आयुक्त यांची कमिटी याची एक महिन्याची मुदत दिली आहे.पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊ नयेत आणि शासनाचीही फसवणूक होऊ नये याची काळजी घेण्यात येणार आहे.

मीच सांगितले असते असा व्यवहार नको

कोणतीही जमीन खरेदी करताना टॉपचे वकील याची तपासणी करत असतात. त्यानंतर पावले पुढे टाकली जात असतात. अशा जमीनीबाबत हरकती आणि सूचना मागवण्यासाठी नोटीस दिली जाते. या जमीनीचा व्यवहार करताना अशी कोणतीही काळजी घेतली नाही. आपल्याला यातले काहीच माहिती नव्हते. जर मला दाखवले असते तर मीच सांगितले असते असला व्यवहार करु नका असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.