मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, अखेरच्या क्षणी भाजपला दणका, थेट पक्षप्रवेश

BMC Election : मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. एका माजी महिला नगरसेवकाने भाजपची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, अखेरच्या क्षणी भाजपला दणका, थेट पक्षप्रवेश
aasawari Patil
Image Credit source: X
| Updated on: Dec 29, 2025 | 10:27 PM

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. जवळपास सर्वच पक्षांनी मुंबईतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उद्या (30 जानेवारी) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र तरीही काही नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने अनेक नाराज नेते अखेरच्या क्षणाला दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. अशातच आता मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. एका माजी महिला नगरसेवकाने भाजपची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आसावरी पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश

मुंबईतील बोरीवली पूर्वेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

भाजपला मोठा धक्का

आसावरी पाटील यांच्या प्रवेशामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. तर अखेरच्या क्षणी भाजपला मोठा धक्का बसला आहे. आसावरी पाटील यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे भाजपची साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश केला याबाबत माहिती समजलेली नाही. मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्येही भाजपला धक्का

नाशिकमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची युती होताच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांचे खंदे समर्थक गणेश मोरे यांनी शेकडो कार्यकर्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते शाहू खैरे, ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, माजी आमदार नितीन भोसले यांच्या पक्षप्रवेशाला गणेश मोरे यांनी विरोध केला होता, मात्र तरीही या नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्याने मोरे यांनी भाजपची साथ सोडली आहे.