AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा दणका, बडा नेता करणार भाजपात प्रवेश, शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्याचपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उद्या बडा नेता शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा दणका, बडा नेता करणार भाजपात प्रवेश, शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 30, 2025 | 3:08 PM
Share

मनिष मासोळे, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला समोरं जावं लागलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे.  महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमधील नेते देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाला लागलेली गळती महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र आता त्याचपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.  धुळे तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आजच मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह सरपंच, उपसरपंच आणि बाजार कमिटी सभापती, संचालकांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश होणार असल्यानं जिल्हयात काँग्रेसला मोठा खिंडार पडलं आहे. धुळे जिल्ह्यात कुणाल पाटील यांची मोठी ताकत आहे, यामुळे धुळे जिल्ह्यात आता भाजपाचं बळ वाढणार आहे.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता, याच मेळाव्यात त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आपन निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नव्हता, तेव्हाच कुणाल पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर ते आता उद्याच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.