उद्धव ठाकरेंना जबर धक्का, महापालिका निवडणुकीपूर्वीच बड्या नेत्याचा राजीनामा, मुंबईतून सर्वात मोठी बातमी समोर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

उद्धव ठाकरेंना जबर धक्का, महापालिका निवडणुकीपूर्वीच बड्या नेत्याचा राजीनामा, मुंबईतून सर्वात मोठी बातमी समोर
उद्धव ठाकरे यांना धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 04, 2026 | 4:37 PM

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, प्रचाराला देखील वेग आला आहे. दरम्यान यापूर्वी झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळालं होतं, या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यानं अशा उमेदवारांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. या बंडखोरीचा फटका अनेक ठिकाणी राजकीय पक्षांना बसल्याचं पहायला मिळालं होतं. असंच चित्र आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील पहायला मिळत आहे. अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. इच्छुकांच्या बंडखोरीचा फटका याही निवडणुकीत राजकीय पक्षांना बसू शकतो. सर्वात जास्त इनकमिंग हे गेल्यावेळी देखील आणि यावेळी देखील भाजपात जास्त झालं आहे. तर याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे.  दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या शुभा राऊळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान शुभा राऊळ यांनी राजीनामा का दिला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तसेच त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत देखील माहिती समोर आलेली नाहीये, त्यामुळे आता त्या शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे, तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईत भाजप, शिवसेना युतीसमोर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मोठं आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे.