AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Result 2022: दहावीच्या बोर्डाच्या निकालबाबत मोठी बातमी; लागू शकतो या तारखेला निकाल

राज्यातील सुमारे 16 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे या निकालाकडे नजर लावून आहेत. निकाल हा ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

SSC Result 2022: दहावीच्या बोर्डाच्या निकालबाबत मोठी बातमी; लागू शकतो या तारखेला निकाल
एसएससी बोर्डImage Credit source: tv9
| Updated on: Jun 09, 2022 | 8:54 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) लवकरच 10वीच्या निकालाबाबत आवश्यक माहिती जारी करू शकते. महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 वीचा निकाल (10th Result) कधी लागणार याकडे अनेक विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यावरून आता लवकरच पडदा उठण्याची शक्यता असून लवकरच 10वीचा निकाल लागू शकतो. महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board)  10 वीचा निकाल हा 15 जून 2022 पर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या वेबसाइटवर नवीन अपडेट्सची वाट पहा.

15 जून 2022 पर्यंत जाहीर होणे अपेक्षित

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर काही दिवसात दहावीचा निकाल लागतो असा आपले कडे पहायला मिळतं. याही वर्षी बारावीचा निकालानंतर दहावीचा निकाल लागतो का आणि तो कधी असा पालकांसह विद्यार्थी प्रश्न करत आहेत. तर दहावीची पेपर तपासणी ही आता पुर्ण झाली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल हा लवकरच लागू शकतो. सध्या राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीवरून मंत्री अडकून आहेत. या निवडणूकीनंतर लगेच निकाल येऊ शकतो. तर 10 वीचा निकाल हा 15 जून 2022 पर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑफिशियल माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या वेबसाइटवर नवीन अपडेट्सची मिळतील.

16 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रतीक्षेत

राज्यातील सुमारे 16 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे या निकालाकडे नजर लावून आहेत. निकाल हा ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा ही मार्च 2022 मध्ये झाली होती. तर काही दिवसांपूर्वीच बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.