AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या शिवसेनेत आता मोठा पक्ष प्रवेश घोटाळा? नेमकं प्रकरण काय?

शिवसेना शिंदे गटातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.

शिंदेंच्या शिवसेनेत आता मोठा पक्ष प्रवेश घोटाळा? नेमकं प्रकरण काय?
| Updated on: Aug 04, 2025 | 4:00 PM
Share

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश करताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्याने चक्क बोगस यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या आधीच पक्ष प्रवेश घोटाळ्याच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघालल आहे.

अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ हे आदिवासी ठाकर समाजाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. मेंगाळ यांनी तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 26 एप्रिल रोजी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आपल्या सोबत अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायचे सरपंच आणि सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याचा दावा मारुती मेंगाळ यांनी त्यावेळी केला होता.

दरम्यान मेंगाळ यांच्यासमवेत पक्ष प्रवेश केलेल्या लोकांची यादी समोर आली असून, यातील अनेक नावे बोगस असल्याचा आरोप आता केला जात आहे.  यादीत नाव असणाऱ्या अनेकांनी आपले व्हिडिओ प्रसारित करत, आपण असा पक्षप्रवेश केलाच नसल्याचा दावा केला आहे.

या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मारुती मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशावेळी पक्षाने आम्हाला कल्पना दिली नाही. काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेशाची यादी समोर आल्यानंतर अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. शहानिशा केल्यानंतर यादीतील 40 ते 50 लोकांची नावे बोगस असल्याचे समोर आलं आहे. पक्षाची आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे आम्ही नेत्यांना कळवल आहे. या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून, वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे यावेळी दराडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधून मारुती मेंगाळ यांनी अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वीच मेंगाळ यांच्यावर पक्ष प्रवेश घोटाळा आणि पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय. या सगळ्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या सर्व विषयावर स्पष्टीकरण देण्यासाठी मारूती मेंगाळ यांनी उद्या सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे, जी भुमिका मांडायची ती पत्रकार परिषदेत मांडू अस मेंगाळ यांनी म्हटलं आहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?