AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवराज दिवटेला मुंडे गँगकडून मारहाण का करण्यात आली? प्रकरणात मोठं ट्विस्ट

एका टोळक्याकडून आधी शिवराज याचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली, बांबू आणि काठीनं मारहाण करण्यात आली.  या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.

शिवराज दिवटेला मुंडे गँगकडून मारहाण का करण्यात आली? प्रकरणात मोठं ट्विस्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2025 | 4:22 PM
Share

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती, या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले, राज्यात संतापाची लाट होती, या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलं आहे. मात्र पुन्हा एकदा बीडमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. परळीमध्ये शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. शिवराज दिवटे असं या तरुणाचं नाव आहे.

एका टोळक्याकडून आधी शिवराज याचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली, बांबू आणि काठीनं मारहाण करण्यात आली.  या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आता नवं ट्विस्ट आलं आहे.  बीडच्या परळीतील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे याला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती.  त्याने दिलेल्या फिर्यादीमध्ये जलालपूरमध्ये झालेल्या मारहाणीचा उल्लेख आहे. जलालपूरमध्ये समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीचा देखील एक व्हिडीओ आता समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये ऋषिकेश गिरी आणि समाधान मुंडे यांना लाथा बुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण सुरू असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या मारहाणीचं कनेक्शन शिवराज दिवटे याला झालेल्या मारहाणीशी असावं असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आता त्या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण 

अखंड हरिनाम सप्ताहून गावी परत जात असताना संध्याकाळच्या सुमारास शिवराज दिवटे याला टोळक्याकडून अडवण्यात आले, त्यानंतर त्याला बीडच्या परळीतील टोकवाडी परिसरात बेदम मारहाण करण्यात आली. जर वेळीच लोक आले नसते तर मी वाचलो नसतो असं शिवराज दिवटे याने म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?