गौरी गर्जे यांची हत्या की आत्महत्या? खळबळजनक माहिती समोर, त्या गोष्टीमुळे प्रकरणात मोठा ट्विस्ट
भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए असलेल्या अनंत गर्जे याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. मात्र या प्रकरणावर पत्नीच्या नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए असलेल्या अनंत गर्जे याच्या पत्नीने आत्महत्या केली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. दरम्यान गैरी गर्जे पालवे यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप गैरी गर्जे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. दम्यान आता या प्रकरणाच्या प्राथमिक अहवालातून खळबळजनक माहिती समोर आली असून, प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.
प्राथमिक अहवालात नेमकं काय म्हटलंय?
प्राथमिक अहवालामध्ये गौरी गर्जे यांच्या शरीरावर अनेक जखमा आहेत असे आढळून आले आहे. शिवाय आरोपीच्या शरीरावरही काही जखमा आढळून आल्या असल्याचा मोठा दावा पोलिसांकडून कोर्टात करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी कोर्टात सांगितलं की, प्राथमिक अहवालामध्ये गौरी गर्जे यांच्या शरीरावर अनेक जखमा आहेत असे आढळून आले आहे. शिवाय आरोपीच्या शरीरावरही काही जखमा आढळून आल्या आहेत, त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या हे आम्हाला तपासायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्हाला आरोपीची कसून चौकशी करायची आहे. सीसीटीव्ही तसेच मोबाईल डाटाही तपासायचा आहे. त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडी वाढून मिळावी.
आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपी असलेल्या अनंत गर्जे याच्या पोलीस कोठडीत वाढ कण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानंतर आता कोर्टानं मोठा निर्णय घेतला आहे. अनंत गर्जे याच्या पोलीस कोठडीमध्ये दोन डिसेंबरपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता गर्जे याचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दोघांमध्ये जे संभाषण झालेले आहे. त्याचे कॉल रेकॉर्ड्स मिळाले असून, ते संशयास्पद वाटत असल्याचीही माहिती पोलिसानी न्यायालयात दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिस तपास करत आहेत.
