AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, अतिवृष्टी बाधितांसाठी पॅकेज जाहीर, फडणवीसांकडून 10 मोठ्या घोषणा

राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, पावसाचा प्रचंड मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी मदतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis : राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, अतिवृष्टी बाधितांसाठी पॅकेज जाहीर, फडणवीसांकडून 10 मोठ्या घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2025 | 3:26 PM
Share

महाराष्ट्राला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे, पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे, शेतकरी हातबल झाले आहेत, घरादारात पुराचं पाणी शिरल्यानं अनेकांचा सगळा संसारच वाहून गेला आहे. अनेकांचे घरं देखील पडले. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेमध्ये अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पॅकेजी घोषणा करण्यात आली आहे. या पॅकेजमधून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत, सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या  पॅकेजची घोषणा केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500  रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. बागायती शेतीला 32500 रुपयांची मदत केली जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा 

1)शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे.

2)  कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500 रुपयांची मदत मिळणार आहे.

3)   हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार  रुपयांची मदत.

4)  तर बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 32500  रुपयांची मदत.

5) अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालं आहे, त्यांच्यासाठी तीस हजार रुपयांची विशेष मदत.

6)  इन्फ्राक्ट्रक्चरसाठी दहा हजार कोटींची तरतूद.

7) पावसामुळे ज्यांची घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, पडली आहेत, अशा लोकांना पीएम आवास योजनेंतर्गत नवं घर, तसेच ज्यांच्या घराचं अंशत: नुकसान झालं आहे, त्यांना घर उभारणीसाठी मदत.

8)  ज्या शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली आहेत, पावसामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे, त्यांना प्रति पशू  37 हजारांची मदत.

9) ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे, त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एकूण साडेतीन लाखांच्या मदतीचा निर्णय, त्यापैकी 47 हजार रुपये हे रोख मिळणार आहेत, तर बाकीचे मनरेगाच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.

10) ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे, त्यांना नुकसानभरपाईची घोषणा.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.