Bird Flu | कोंबड्या, पोपट, कावळ्यांपाठोपाठ आता शेकडो मधमाशांचा मृत्यू; नांदेडमध्ये खळबळ

नांदेडमध्ये अचानक शेकडो मधमाशांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (bird Flu In Maharashtra. hundreds of Bee Died In nanded)

  • राजीव गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड
  • Published On - 15:31 PM, 11 Jan 2021

नांदेड: बर्ड फ्ल्यूमुळे केवळ कोंबड्या, पोपट आणि कावळ्यांवरच संकट ओढवलेले नाही तर इतरही पक्ष्यांवर त्याचं संकट घोंघावताना दिसत आहे. नांदेडमध्ये अचानक शेकडो मधमाशांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बर्ड फ्ल्यूमुळेच या मधमाशांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यात ही बातमी पसरल्याने नागरिक घाबरून गेले आहेत. (bird Flu In Maharashtra. hundreds of Bee Died In nanded)

नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी गावात शंभर कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरात शेकडो मधमाशा मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक घाबरून गेले आहेत. जंगलातील मधमाशा शहरात मृत्यूमुखी पडल्याने या मधमाशांनाही बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती की काय? असा प्रश्न केला जात आहे. शेकडो मधमाशा मृत्यूमुखी पडल्याचं आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे. या विभागाची टीम घटनास्थळी येणार असून पुढील कार्यवाही करणार आहे. दरम्यान, चिंचोर्डीतील तीन पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या शंभर कोंबड्या दगावल्या आहेत. या कोंबड्यांना दफन करण्यात आलं असून त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील परभणीसह मुंबई, ठाणे, रत्नागिरीतील दापोली आणि बीडमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बीड आणि परभणीतील मुरुंबा गावात कोंबड्याचा मृत्यू झाला होता. भोपाळच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रत्नागिरीतील दापोली आणि मुंबईतील चेंबूरमधील कावळ्यांचा आणि ठाण्यातील पोपटांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचंही प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले असून राज्य शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Promo | आखाडा | कडक विषय, कडक चर्चा | दररोज दुपारी 4 वाजता

80 हजार कोंबड्या मारणार

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या दगावल्याने स्थानिक प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचं निदान करण्यात आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत या दहा हजार कोंबड्या मारून जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबड्या गाडण्यात येणार आहे. (bird Flu In Maharashtra. hundreds of Bee Died In nanded)

 

संबंधित बातम्या:

Bird Flu | संकट वाढले! राज्यातील पाच जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू; प्रशासन अ‍ॅलर्ट

Bird Flu | परभणीत बर्ड फ्ल्यूचा धसका; संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

(bird Flu In Maharashtra. hundreds of Bee Died In nanded)