VIDEO | सांगली शहरात गवा शिरला, तीन तास मुक्त संचार, नागरिकांमध्ये घबराट

सांगलीतील विश्रामबाग भागात गव्हर्मेंट कॉलनीमध्ये रविवारी संध्याकाळी गव्याचा वावर दिसून आला. (Bison Indian Gaur Sangli City)

VIDEO | सांगली शहरात गवा शिरला, तीन तास मुक्त संचार, नागरिकांमध्ये घबराट
सांगली शहरात गव्याचा मुक्त वावर
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 8:54 AM

सांगली : पुण्यानंतर आता सांगली शहरात गवा-रेडा शिरल्याची घटना समोर आली आहे. भरवस्तीत गव्याचा वावर पाहून नागरिकांची पाचावर धारण बसली. वन विभागाकडून गव्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सांगलीतील विश्रामबाग भागात गव्हर्मेंट कॉलनीमध्ये कुंभार मळ्यात गव्याचा वावर दिसून आला. रविवारी सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत गवा संचार करत होता. हा गवा नागरी वस्तीत कुठून आला, हे अद्याप समजलेलं नाही. त्यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. (Bison Indian Gaur Found in Sangli City Video Viral)

बघ्यांची गर्दी, गवा ऊसाच्या शेतात गायब

काही स्थानिक रहिवासी गव्याचा पाठलागही करत होते. यावेळी ही घटना वाऱ्यासारखी सर्व सांगलीत पसरली आणि बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनास्थळी प्राणीमित्र, पोलीस आणि वन विभाग दाखल झाले होते. अंधाराचा फायदा घेत गवा ऊसाच्या शेतात गायब झाला. मात्र आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

वन विभागाचे नागरिकांना आवाहन

यावेळी वन विभागाचे कर्मचारी गवा शोधण्यासाठी घटनास्थळी आले. गवा रेड्याचा शोध सुरु होता. पण नागरिकांनी सहकार्य करावे, गवा रेडा निदर्शनास आला तर वन विभागाला तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

पाहा व्हिडीओ

पुण्यातील गव्याचा हुल्लडबाजांमुळे मृत्यू

दरम्यान, डिसेंबर महिन्यात पुण्यातील कोथरुडमध्ये एक रानटी गवा फिरताना आढळून आला होता. महात्मा सोसायटीच्या परिसरात या गव्याचा वावर पाहायला मिळाला होता. जंगलातून वाट चुकून माणसांच्या सिमेंटच्या जंगलात आलेल्या जखमी रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीन जीव घेतला होता. (Bison Indian Gaur Found in Sangli City Video Viral)

700 ते 800 किलो वजनाचा हा रानगवा अंदाजे 3 ते 4 वर्षाचा होता. नैसर्गिक अधिवास संपत आल्यानं मानवी वस्तीत आलेल्या या वन्यप्राण्यांना सहानुभूतीने वागणूक देण्याची आवश्यकता असते. पण हुल्लडबाजी करणाऱ्या अतिउत्साही नागरिकांमुळे रानगव्याला जीव गमवावा लागला. कोथरूडमध्ये रानटी गवा शिरल्याची बातमी समजताच महात्मा सोसायटीच्या परिसरात अनेक बघ्यांनी गर्दी केली. सोशल मीडियावर या रानटी गव्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये हा रानटी गवा काहीसा भेदरलेला दिसत होता.

दोरखंड आणि डोळ्यावर कपडा

गव्याला बेशुद्ध करण्यापूर्वी त्याच्या गळ्यात दोरखंड टाकण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या डोळ्यावर कपडा टाकण्यात आला आणि त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले गेले. जमाव बघून गवा बिथरू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती. त्यानंतर त्याला कंटेनरच्या सहाय्याने उचलून गाडीत टाकून नेण्यात आले. मात्र, जखमी आणि आधीच बिथरलेल्या या गव्याचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या:

तहानलेला ससा, रोज मानवी वस्तीत येतो, पाणी पितो, निघून जातो

कोथरुडच्या सोसायटीत शिरला रानटी गवा, पुणेकरांची गर्दी

(Bison Indian Gaur Found in Sangli City Video Viral)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.