AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंकडून भाजपला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, म्हणाले “प्रभू रामचंद्र…”

भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजनही झाले. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वर्धापन दिनावर तीव्र टीका केली. त्यांनी भाजपच्या वर्धापन दिनाच्या तारखेबाबत प्रश्न उपस्थित केले आणि गेल्या २७ वर्षांना "वनवास" म्हणून संबोधित केले. त्यांनी भाजपला प्रभू रामचंद्रांच्या आदर्शांवर चालण्याचा सल्ला दिला.

उद्धव ठाकरेंकडून भाजपला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, म्हणाले प्रभू रामचंद्र...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2025 | 2:41 PM
Share

भारतीय जनता पक्षाचा आज 46 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आज नागपुरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागपुरातील महानगरात भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रविण दटके, तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानिमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी नुकतंच शिवसंचार सेनेच्या लोगोचे अनावरण केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी उद्धव ठाकरे यांना भाजपच्या वर्धापन दिनाबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला सणसणीत टोला लगावला.

तर मग शुभेच्छा कशा देणार?

“कोणाचा वर्धापन दिन आहे. तिथीप्रमाणे की तारखेप्रमाणे का सोयीप्रमाणे. नक्की कशाप्रमाणे वर्धापन दिन आहे. भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे आहे हे आधी सांगा. मग मी त्यांना शुभेच्छा देतो. तुम्हालाच जर नक्की माहिती नसेल तर मग शुभेच्छा कशा देणार?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

गेली २७ वर्ष मी तो वनवास समजू का?

“माझ्या शुभेच्छा मित्रपक्षाला नव्हे तर सर्वांनाच असतात. रामनवमी हा जर तुमच्या पक्षाचा जन्मदिवस असेल, तर प्रभू रामचंद्र जसे वागले होते, तसा वागण्याचा प्रयत्न करा. या एवढच्या माझ्या त्यांना शुभेच्छा. गेली २७ वर्ष मी तो वनवास समजू का?” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्याला कोणताही मोबदला मिळत नाही

आज काळ झपाट्याने पुढे चालला आहे आणि मोबाईल आपल्या शरीराचा अविभाज्य भाग बनला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर सामान्य माणसाची फसवणूक होत असेल, तर ते निश्चितच चुकीचे आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून केबल जातात, परंतु त्या शेतकऱ्याला कोणताही मोबदला मिळत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले. गरज असल्याने आपण सगळे कर भरतो. पण ही जी लूट सुरू आहे, ती थांबवण्यासाठी शिवसेना आता पुढे येत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा