AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Cabinet Minister 2024 : भाजपच्या किती मंत्र्यांनी घेतली शपथ? 9 नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संपूर्ण यादी

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. दरम्यान आता मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

BJP Cabinet Minister 2024 : भाजपच्या किती मंत्र्यांनी घेतली शपथ? 9 नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संपूर्ण यादी
| Updated on: Dec 15, 2024 | 6:39 PM
Share

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं 231 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामध्ये भाजपनं 132 जागा जिंकल्या तर शिवसेना शिंदे गटानं 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं 41 जागांवर विजय मिळवला. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या, त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दहा जागा, शिवसेना ठाकरे गटाच्या 20 जागा आणि काँग्रेसच्या 16 जागांचा समावेश आहे.

राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. भाजपकडून यावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर काही अनुभवी लोकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपकडून 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली.

नव्या चेहऱ्यांना सधी 

भाजपकडून यावेळी नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ,आकाश फुंडकर, जयकुमार गोरे यांच्यासह काही जणांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

भाजप मंत्र्यांची संपूर्ण यादी 

गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके, जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजप सर्वात मोठा पक्ष

दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपनं राज्यात तब्बल 131 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्यात भाजपच्या सर्वात जास्त म्हणजे 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता कोणाला कोणतं खात मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांनी आज शपथ घेतली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?