AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकास करेल त्याला किडनी, भुसावळच्या भाजप नगरसेवकाची खुली ऑफर

भुसावळच्या एका नगरसेवकाने निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचननाम्यानुसार विकास कामे होत नसल्याने स्वतःची किडनी विकून कामे करण्याचा निर्धार केला आहे (BJP corporator offer kidney to one who will develop city).

विकास करेल त्याला किडनी, भुसावळच्या भाजप नगरसेवकाची खुली ऑफर
| Updated on: Jul 13, 2020 | 5:16 PM
Share

जळगाव : भुसावळ नगरपालिकेचे भाजप नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचननाम्यानुसार विकास कामे होत नसल्याने स्वतःची किडनी विकून कामे करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे महेंद्र सिंग ठाकूर हे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहे (BJP corporator offer kidney to one who will develop city).

“नागरिकांना शुद्ध पाणी आणि चांगले रस्ते तयार करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रशासन आणि नगराध्यक्ष यांच्याशी वारंवार चर्चा करुनदेखील कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे माझ्या प्रभागात जो कोणी विकास कामे करुन देईल त्याला मोबदल्यात मी किडनी देण्यास तयार आहे”, असं नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर म्हणाले (BJP corporator offer kidney to one who will develop city).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

भुसावळ नगरपालिकेची 2016 साली निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भाजपचे 47 पैकी 28 नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महेंद्र सिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. यावेळी एकनाथ खडसे यांनी प्रचारसभेत रस्ते आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या साडेचार वर्षात एकनाथ खडसे यांचं हे आश्वासन पूर्ण होऊ न शकल्याने महेंद्र सिंग ठाकूर नाराज आहेत.

भाजपने जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या कामांपैकी 90 टक्के कामं झाल्याचा दावा महेंद्र सिंग ठाकूर यांनी केला आहे. मात्र, रस्ते आणि शुद्ध पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहीला, असं महेंद्र सिंग ठाकूर म्हणाले. रस्त्यांसाठी बऱ्याचदा टेंडर निघाले, निधी आला, मात्र सर्व निधी परत गेला, असा खुलासा ठाकूर यांनी केला.

हेही वाचा : भारतात Google तब्बल 75 हजार कोटीची गुंतवणूक करणार, सीईओ सुंदर पिचाईंची मोदींसोबत बैठक

“मी वॉर्डात बऱ्याच व्यक्तींना शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला. आता कोरोनाचं संकट आलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमच्याजवळ सहा महिने वेळ होता. मात्र, तरीही आम्ही कामे करु शकलो नाहीत. आम्ही साधी मीटिंग घेऊ शकलो नाहीत. मी त्याअगोदरही अनेकवेळा रस्त्यांच्या कामासाठी वारंवार विषय मांडला. पण दखल घेतली नाही”, असं महेंद्र सिंग ठाकूर म्हणाले.

दरम्यान, “जनतेने भाजपविरोधात काम करतोय असं समजू नये. येणारा नगराध्यक्ष हा एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्याच मर्जीचा असेल. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवू. जनता आम्हाला शंभर टक्के आशीर्वाद देईल”, असा विश्वास नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी व्यक्त केलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.