AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Power Cut ! सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?; शेलार कडाडले

मुंबईत अचानक वीज पुरवठा का जातो. या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कुठे आहे वीज मंत्री? मुख्यमंत्री आता जनतेशी का बोलत नाहीत?, असे सवाल करतानाच मुंबईकरांवर बेततं तेव्हा गायब होणारी ही मंडळी आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

Mumbai Power Cut ! सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?; शेलार कडाडले
| Updated on: Oct 12, 2020 | 1:01 PM
Share

मुंबई: मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईत वीज गायब झाली. ही नियोजन शून्यता असून या सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?, असा सवाल करतानाच या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. (ashish shelar slams maharashtra government over power failure)

आशिष शेलार यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना ही टीका केली आहे. मुंबईत अचानक वीज पुरवठा का जातो. या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कुठे आहे वीज मंत्री? मुख्यमंत्री आता जनतेशी का बोलत नाहीत?, असे सवाल करतानाच मुंबईकरांवर बेततं तेव्हा गायब होणारी ही मंडळी आहेत, अशी टीका शेलार यांनी केली. केवळ नियोजन शून्यतेमुळे विद्यार्थी आणि रुग्णांची दुरावस्था होत आहे. चाकरमानी लोकलमध्ये अडकले आहेत. हा केवळ नियोजन शून्यतेचा परिणाम आहे. या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या तात्काळ निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली.

वीज पुरवठा खंडित होऊ शकतो याची पूर्व कल्पना सरकारला नव्हती का?, असा सवाल करतानाच वीज पुरवठा खंडित झाल्याने कुणाला दगा फटका झाला तर त्याचं पाप या सरकारवर असेल, असंही ते म्हणाले. एक तासात वीज पुरवठा सुरळीत करणार असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत सांगत आहेत. वीज पुरवठा सुरळीत होईल म्हणजे तुम्ही उपकार करत नाही? आधी तासभर वीज गेलीच कशी याचं उत्तर मुंबईकरांना द्या, असंही ते म्हणाले.

सरकार बेजबाबदार

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे बेजबादार सरकार आहे. वीज जाणार हे माहीत होते तर लोकांना अवगत करायला हवं होतं. मुंबईत वीज गेल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत, असं दरेकर म्हणाले. वीज पुरवठा खंडित झाल्याने कोविड सेंटरमधील रुग्णांची प्रचंड गैरसोय झाली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (ashish shelar slams maharashtra government over power failure)

संबंधित बातम्या:

mumbai power cut ! मुंबई-ठाण्यातील बत्तीगुल झाल्याने रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

(ashish shelar slams maharashtra government over power failure)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.