चंद्रकांत पाटील यांनी शब्द पाळला, शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात 

चंद्रकांत पाटील यांनी शब्द पाळला, शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात 
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

या निधीचा धनादेश अमल महाडिक यांच्या हस्ते पाटील कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. (Chandrakant Patil help martyred soldiers family)

Namrata Patil

|

Jan 27, 2021 | 6:55 PM

मुंबई : देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे निगवे गावचे सुपुत्र शहीद संग्राम पाटील आणि बहिरेवाडी गावचे सुपुत्र शहीद ऋषिकेश जोंधळे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शहीद संग्राम पाटील यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तर शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. (Chandrakant Patil helping hand to the families of the martyred soldiers)

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातल्या बहिरे गावचे सुपुत्र हृषिकेश जोंधळे आणि करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे सुपुत्र संग्राम पाटील यांना सीमेवर रक्षण करताना वीरमरण आले. हृषिकेश जोंधळे यांचे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहतात. तर संग्राम पाटील यांना दोन मुले असून, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. यापैकी हृषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांना पक्क घर बांधून देण्याचा शब्द चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.

तर संग्राम पाटील यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी दोन्ही कुटुंबांना मदत करत चंद्रकांत पाटील यांनी आपला शब्द पूर्ण केला.

प्रजासत्ताक दिनी जोंधळे कुटुंबियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पक्क्या घराचे भूमीपूजन तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. तर संग्राम पाटील यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाखांच्या निधी संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आला. या निधीचा धनादेश माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते पाटील कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. (Chandrakant Patil help to the families of the martyred soldiers)

संबंधित बातम्या : 

गोसीखुर्दचा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार? हा आहे गडकरी मार्ग

माजी सैनिकासाठी पडळकर, खोत थेट प्रांताधिकाऱ्याच्या केबिनमध्ये

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें