AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सुषमा अंधारे, राखी सावंत, दोघी बहिणी’, भाजप नेत्याची टीका जिव्हारी लागणार?

उद्धव ठाकरेंनी फडतूस म्हणताच या शब्दावर भक्तगण चेकाळले. भक्तगणांचा चॉइसच फडतूस आहे, अशी टीका काल सुषमा अंधारे यांनी ठाण्याच्या मोर्चात केली.

'सुषमा अंधारे, राखी सावंत, दोघी बहिणी', भाजप नेत्याची टीका जिव्हारी लागणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2023 | 2:16 PM
Share

गिरीश गायकवाड, मुंबई : संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यातील वाद विकोपाला गेले असतानाच एका भाजप नेत्याने सुषमा अंधारे यांच्यावर आणखी एक जहरी टीका केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची तुलना सिने अभिनेत्री राखी सावंत हिच्याशी केली आहे. दोघी बहिणी बहिणी असून एकमेकींच्या प्रतिस्पर्धीदेखील आहेत, असं वक्तव्य भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलंय. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्याच बनल्या आहेत. शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर त्या कडाडून टीका करतात. यामुळे माध्यमांतूनही त्या वारंवार झळकतात. यावरूनच मोहित कंबोज यांनी ही टीका केली आहे.

कंबोज यांचं ट्विट चर्चेत

ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महाविकास आघाडीतर्फे काल भव्य मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी आधीही देवेंद्र फडणवीसांना फडतूस असे संबोधून राजकारण तापवलंय. त्यातच कालच्या मोर्चात सुषमा अंधारे यांनीदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या याही भाषणाची ठाण्यात चर्चा आहे. यानंतर आज मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांच्यावरच टीकास्त्र डागले आहे. अंधारेंवर खोचक टीका करणारं ट्विट त्यांनी केलंय. त्यात त्यांनी लिहिलंय-

सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं …

एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में …..

दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा सनसनी कौन मचाई गा !

राखी सावंत ही अभिनेत्रीदेखील अनेक वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असते. त्याप्रमाणेच सुषमा अंधारेदेखील सनसनी वक्तव्यांतून चर्चेत असतात, अशा आशयाचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.

ठाण्यात तुफ्फान फटकेबाजी

ठाण्यातील महामोर्चात सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट केलं. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील महापुरुषांचा वारंवार अवमान केला गेला. मात्र तेव्हा कार्यकर्ते चेकाळले नाहीत. मात्र उद्धव ठाकरेंनी फडतूस म्हणताच या शब्दावर भक्तगण चेकाळले. भक्तगणांचा चॉइसच फडतूस आहे, अशी टीका काल सुषमा अंधारे यांनी केली. त्यावरून मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.