AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : पुराने पेडो का मजाक…24 तासात नवनीत राणांचे दुसरे स्टेटस, रोख कुणाकडे? चर्चेला उधाण

भाजपाचे आमदार आणि रवी राणा यांच्यात वाद रंगलेला असताना नवनीत राणा यांनी 24 तासांमध्ये सलग दुसरे स्टेटस ठेवले आहे. त्यांच्या या दुसऱ्या स्टेटसचीही चर्चा होतेय.

Navneet Rana : पुराने पेडो का मजाक...24 तासात नवनीत राणांचे दुसरे स्टेटस, रोख कुणाकडे? चर्चेला उधाण
navneet rana statusImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 8:12 PM
Share

Ravi Rana Status : अमरावती जिल्ह्यातील राजकारणात रवी राणा यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या पत्नी तथा भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यादेखील खूप चर्चेत असतात. सध्या रवी राणा यांनी केलेल्या एका विधानामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाचे नेते रविराज देशमुख यांचे तिकीट मीच कापले, असे विधान रवी राणा यांनी केले होते. त्यामुळे भाजपाच्या तीन आमदारांनी एकत्र येत त्यांचा दावा फेटाळला होता. या सर्व घटनांमुळे अमरावतीमध्ये रवी राणा आणि भाजपा नेत्यांमध्ये वाद रंगलाय. दरम्यान, आता रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी एक स्टेटस ठेवले आहे. त्यांच्या या स्टेटसमुळे तर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

नवनीत राणा यांच्या स्टेटसमध्ये नेमकं काय?

भाजपाचे आमदार आणि रवी राणा यांच्यात वाद रंगलेला असताना नवनीत राणा यांनी 24 तासांमध्ये सलग दुसरे स्टेटस ठेवले आहे. त्यांच्या या दुसऱ्या स्टेटसचीही चर्चा होतेय. हे स्टेटस ठेवताना त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही किंवा कोणाचाही उल्लेख केलेला नाही. परंतु त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, असा सवाल आता अमरावतीच्या राजकारणात उपस्थित केला जातोय. ‘पुराने पेडो का मजाक उडा रहेथे नये पौधे… इन्होने अभी तुफानो के झटके नही देखे,’ असं सूचक विधान त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये केलंय. नवनीत राणांचा रोख पक्षातील स्वकीयांकडे की विरोधकांकडे? असं विचारलं जातंय.

वाद नेमका का सुरू झाला?

आमदार रवी राणा यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना भाजपाचे नते रविराज देशमुख यांचे तिकीट मीच कापले, असं थेट विधान केलं. या विधानानंतर त्यांना त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असावा, म्हणूनच त्यांनी हे विधान केले असावे, असा टोला रविराज देशमुख यांनी लगावला होता. त्यानंतर भाजपाने पत्रकार परिषद घेत कोणाचे तिकीट कापायचे आणि कोणाला तिकीट द्यायचे हे भाजपाचा अंतर्गत निर्णय असतो, असे सांगत रवी राणा यांचा दावा फेटाळून लावला. उमेदवारीचा निर्णय भाजपाच्या संसदीय मंडळाकडून घेतला जातो, असेही स्पष्टीकरण भाजपाने दिले.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत