हत्ती गेलाय शेपटू राहिलंय… प्रसाद लाड यांचं मोठे वक्तव्य… मनोज जरांगे यांच्या त्या मागण्या पूर्ण होणार? लक्ष्मण हाके यांचं नाव घेत…

Prasad Lad on Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील काही मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यापूर्वीच हालचाली वाढल्या आहेत. भाजप नेते प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीत पोहचले आहेत. त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

हत्ती गेलाय शेपटू राहिलंय... प्रसाद लाड यांचं मोठे वक्तव्य... मनोज जरांगे यांच्या त्या मागण्या पूर्ण होणार? लक्ष्मण हाके यांचं नाव घेत...
प्रसाद लाड, मनोज जरांगे पाटील
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 22, 2026 | 11:45 AM

Prasad Lad on Maratha Reservation Fadnavis Government Decision: मराठा समाज आणि मराठा आरक्षणासंदर्भातील काही मागण्या मान्य न झाल्याने मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी 30 मे रोजी आमरण उपोषणाचं शस्त्र उपसलं आहे. त्यापूर्वीच मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण न करण्याचे आवाहन केले आहे. आपण मनोज जरांगे यांचा लहान भाऊ म्हणून इथं दाखल झाल्याचे आणि त्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोहचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले. मराठा आरक्षणाविषयी हत्ती गेला आणि शेपूट राहिले आहे, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले आहे.

समाजाचे विषय तडीस जातील

“मी वैयक्तिक मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आलो आहे. मनोज दादांनी जर फोन केला तर मुख्यमंत्री स्वतः त्यांच्याशी बोलू शकतात. मराठा समाजाला मनोज जरांगे यांनी स्वाभिमान मिळवून दिला आहे. मी मनोज जरांगेंचा निरोप घेऊन जाईल. निश्चितपणे दादांचा सन्मान राहील आणि समाजाचं काम होईल. मी जातीसाठी माती खायला तयार आहे. मी समाजासाठी इतक्या दूर इथं आलो आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमंत्रणावरून मी इथं आलो आहे. मला काही जणांनी धमकीचे फोन केले. शिव्या दिल्या. मी समाजासाठी मरायला सुद्धा तयार आहे. मी काही चूक केली असेल तर मनोज जरांगे यांनी सांगावं की चुकला म्हणून. मी युद्ध पेटवायला आलेलो नाही. मी भगवत गीतेतील सार घेऊन आलो आहे. मला माझ्या समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. माझ्या समाजाच्या भावनेसोबत राहायचं आहे. समाजाचे जे राहिलेले विषय आहेत, ते पूर्ण करायंचे आहेत. मनोज जरांगे यांच्या 7-8 मागण्या समजून घेणार आहे. मला खात्री आहे की समाजाचे विषय तडीस जातील.” असे भाजप नेते प्रसाद लाड यांनी सांगितले.

तर आमदारकीचा राजीनामा देईल

मनोज जरांगे यांच्या 7-8 मागण्या असल्याचे मला कळले. त्या मागण्या समजून घेईल. या मागण्या उपसमिती आणि सरकार यांच्याशी बोलले. या मागण्या का पूर्ण झाल्या नाही हे समजून घेईल. यामागे काय कारणं आहेत हे समजून घेईल. काही गोष्टीत कायदेशीर अडचणी असतात. काही ठिकाणी पाठपुरावा हा विषय असतो. या मागण्या त्यांनी सांगितल्या. काही काळ दिला. तर मी या मागण्या पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेल. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी शब्द दिला होता की माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल. मी समाजासाठी राजीनामा देईल. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. देशात 7 कोटींपेक्षा अधिक मराठा समाज आहे. देशावर मराठा समाजाचे, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेबांनी दिलेले संस्कार आहेत. मराठा समाजासाठी मला खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळणार असेल तर मी प्रयत्न करेल असे आश्वासन भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिले.

मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये

मनोज जरांगे यांनी 30 मे रोजी आमरण उपोषण करू नये असे आवाहन प्रसाद लाड यांनी केले. सध्या उन्हाळा सुरू आहे. शेतीची कामांची लगबग सुरू होत आहे. शाळा सुरू होणार आहे. उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम झाला आहे. त्यांनी आमरण उपोषण करू नये. आता हत्ती गेला आणि शेपटू राहिले आहे. सरका दरबारी त्यांच्या मागण्या पोहचवणार असल्याचे प्रसाद लाड यांनी आश्वासन दिलं.

हाकेंना पोटशूळ उठण्याचे काम नाही

तर यावेळी प्रसाद लाड यांनी प्राध्यापक हाके यांनाही मोठे आवाहन केले. आपण अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांना भेटायला आलोय. त्यांना पोटशूळ उठण्याचे कारण नाही असा टोलाही लाड यांनी लगावला. अंतरवाली सराटी हे मराठ्यांचं केंद्रबिंदु असल्याचे लाड म्हणाले. त्यांनी यावेळी सरकार जरांगेंच्या मागण्याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले.

Follow Us