AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगावेगळं काही त्यांनी…एकवेळच्या जवळच्या मित्राने राज ठाकरेंबद्दल वापरले बोचरे शब्द

राज ठाकरे यांच्या मनसेने आज मतचोरी विरोधात मोर्चा आयोजित केला होता. महाविकास आघाडीचे नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या एकवेळच्या जवळच्या मित्राने त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

जगावेगळं काही त्यांनी...एकवेळच्या जवळच्या मित्राने राज ठाकरेंबद्दल वापरले बोचरे शब्द
Raj Thackeray
| Updated on: Nov 01, 2025 | 3:51 PM
Share

आज मनसे आणि महाविकास आघाडीने सत्याचा मोर्चा आयोजित केला आहे. मनसे आणि मविआकडून मतचोरीचा आरोप होतोय. दक्षिण मुंबईतील सीएसटी परिसरात हा मोर्चा सुरु आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या सत्याच्या मोर्चावर खोचक टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या लोकल प्रवासावरही त्यांनी बोचरी टीका केली. “याद्यांमध्ये चूक असेल तर दुरुस्ती झाली पाहिजे आणि हे सुरू असतं. मात्र त्या मागे भावना ही मतदार यादी नसून मिळणारे अपयश आहे. पराभवाची कारण हे मतदार याद्या असाव्यात यासाठी हे केलं जातं आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले. “लोकसभा निवडणुकीमध्ये देखील हेच evm होते. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता विरोधी पक्षावर आलीय. नौटंकी करण्यापेक्षा काम केलं पाहिजे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.

“एकी आहेत म्हणतात, एकी आहे का? मग, सर्वांचीच तोंडे वेगवेगळी आहेत. मारून मिसळून आणलेले आणि गोंधळलेले विरोधक आहेत” असं दरेकर म्हणाले. राज ठाकरे यांच्या लोकल प्रवासावर सुद्धा दरेकर यांनी टीका केली. “लोकलने तर सर्वसामान्य लोकं दररोज प्रवास करतात. यात वेगळं काही नाही, किमान लोकांच्या समस्या तरी त्यांना समजतील. जगावेगळं काही त्यांनी केलय, असं मला वाटत नाही. सत्य हे पर्मनंट असायला हवं, असत्याची पाठराखण करायची आणि नाव सत्याचा मोर्चा हे बरोबर नाही” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

एकवेळचा विश्वासू मैत्री

प्रवीण दरेकर हे एकवेळचे राज ठाकरे यांचे विश्वासू आणि जवळचे मित्र होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून दोघे एकत्र आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते. ते मनसेच्या तिकीटवर मागाठणे विधानसभा मतदारसंघातून एकदा आमदारही राहिले आहेत.

संभ्रमावस्थेत असलेला विरोधी पक्ष

“भाई जगताप यांनी भूमिका स्पष्ट केली. प्रदेशाध्यक्ष यांची वेगळी भूमिका आहे. संभ्रमावस्थेत असलेला विरोधी पक्ष आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले. सिकंदर शेख अटक प्रकरणावर दरेकर म्हणाले की, “पोलीस योग्य काय आहे ते प्रकरण जाणून घेतील. त्यानंतरच कारवाई होईल. पण जर कोणी गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं होऊ नये अशी आमची भूमिका असेल”

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....