AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Kolhapur Flood | माझ्या प्रश्नाचं उत्तर जयंत पाटलांकडे नाही : गोपीचंद पडळकर

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत आज लोकप्रतिनिधींची आढावा बैठक पार (Gopichand Padalkar Criticizes Jayant Patil) पडली.

Sangli Kolhapur Flood | माझ्या प्रश्नाचं उत्तर जयंत पाटलांकडे नाही : गोपीचंद पडळकर
| Updated on: Jun 20, 2020 | 11:16 PM
Share

सांगली : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत आज लोकप्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत गेल्यावर्षी झालेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर वडनेर समितीच्या अहवालातील मुद्द्याबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. (Gopichand Padalkar Criticizes Jayant Patil On Sangli Kolhapur Flood)

सातारा, सांगली आणि कोल्हापुरात 15 दिवसांवर पूरपरिस्थिती आली आहे. या बैठकीत पडळकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर न देता बैठक संपली, असे घोषित केले.

“सांगली जिल्ह्यात 34 गावात बोटींची मागणी असताना फक्त 15 बोटींचे टेंडर निघाले आहे. गेल्या वर्षभरात या बोटी देता आल्या नाहीत. ज्या कंत्राटदाराकडे हे टेंडर दिले त्यांच्याकडे याची व्यवस्था नाही. हा प्रश्न जेव्हा मी उपस्थित केला तेव्हा मला विषय कळत नाही,” असं सांगत जयंत पाटील यांनी सभा बरखास्त केली, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

“जर पुढील 15 दिवसानंतर जर संभाव्य स्थिती निर्माण झाली तर याबाबत काय करणार याचे उत्तर जयंत पाटील यांच्याकडे नाही. हे सरकार बोटी देऊ शकणार नसेल तर पूरपरिस्थिती कशी हाताळणार असा सवालही गोपीचंद पडळकरांनी उपस्थितीत केला. तसेच सर्व भागात बोटी उपलब्ध करून द्या,” अशी मागणीही पडळकरांनी केली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यासाठी वेगळे काही करत असल्याचं जलसंपदा खात्याचे प्रेझेन्टेशन करत आहेत, हे निषेधार्थ आहे. जयंत पाटील यांनी तळा-गळात जाऊन काम करावे, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

जयंत पाटलांकडून उपाययोजनांची माहिती

ज्या भागात बोटी पुन्हा चालू करण्याच्या आणि अतिरिक्त काही बोटी लागल्या तर जिल्हा परिषदेमार्फत त्याची खरेदी पूर्ण होत आली आहे. NDRF च्या एका टीमने आधीच येऊन मुक्काम करावे, यासाठी त्यांना निमंत्रण दिले आहे. नदी काठच्या गावा-गावात ट्रेनिंग दिले जाणार आहे.

वड़नेर समितीच्या अहवालाबाबत तीन जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे. पुढच्या आठवड्यात मी कर्नाटकातील जलसंपदा मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांनाही चर्चेसाठी निमंत्रित करणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये समन्वय राहून पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. (Gopichand Padalkar Criticizes Jayant Patil On Sangli Kolhapur Flood)

संबंधित बातम्या : 

Kolhapur Rains | 75 ट्रान्सफॉर्मर, 2 हजार पोल, 31 बोटी सज्ज, महापुराचा सामना, कोल्हापूर सज्ज

Kolhapur Rain | कोल्हापुरात तुफान पाऊस, पंचगंगेची पातळी 23 फुटांवर, 17 बंधारे पाण्याखाली

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....