AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात खळबळ, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याचा सर्वात मोठा खुलासा

आष्टी-पाटोदाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याकांडातील "क्लीन बोल्ड" विधानाने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर टीका केली. धस यांनी जनतेच्या सेवेवर आणि राजकारणातील आदर्शांवर जोर दिला.

राजकारणात खळबळ, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याचा सर्वात मोठा खुलासा
| Updated on: Sep 14, 2025 | 8:14 AM
Share

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून सुरु आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. आता याप्रकरणानंतर भाजपचे आष्टी-पाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मी एका मोठ्या नेत्याची विकेट पाडली, असे सुरेश धस म्हणाले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार सुरेश धस हे चिखलीतील येथील नवसाला पावणारी देवी लक्ष्मी मातेच्या नवसपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमासाठी चिखलीत आले होते. यावेळी त्यांची पेढातूला करण्यात आली. या कार्यक्रमात त्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच यावेळी स्थानिक जनतेने त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले.

क्लीन बोल्ड होण्याची पाळी आली

नागपूरच्या पहिल्याच आधिवेशात मी संतोष देशमुख यांचा मुद्दा मांडला आणि त्याप्रकरणी न्यायच मिळवून घेतला. यात एका मोठ्या नेत्याची विकेटही त्यात पडली. ते पण क्लीन बोल्ड होण्याची पाळी त्यांच्यावर आली. कारण त्यांचे सहकाऱ्यांनी हा उद्योग केला होता, असे सुरेश धस म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव न घेतले नाही. पण त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर टीका केली.

फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा अधिकार आपल्याला आहे का?

आता हे जिंदाबाद ते जिंदाबाद चाललं आहे याच भान जरा राहिले पाहिजे, आपण कोणाचा जिंदाबाद करतोय , हम सब अंगार हे म्हणायचं बाकी भंगार है अशा पद्धतीच्या घोषणा देतात. याला फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा अधिकार आपल्याला आहे का, असा सवालही सुरेश धस यांनी केला.

छाताड फुगवणारे आणि लॉकेट घालणारे विधानभवनात जास्त काळ टिकत नाहीत

एक लाख ४१ हजार मतदारांनी मला मतदान दिलं, ही माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे. माझा कोणताही कारखाना नाही, संस्था नाही किंवा मी कोणताही सम्राट नाही. पण, जनतेच्या मनावर प्रेम करणारा मी नक्कीच सम्राट आहे. काही लोक निवडून आल्यावर स्वतःला मालक समजतात आणि डरकाळी फोडतात. पण, आम्ही जनतेचे सालकरी आहोत आणि आम्ही तसेच राहिलो पाहिजे. छाताड फुगवणारे आणि लॉकेट घालणारे विधानभवनात जास्त काळ टिकत नाहीत, असेही सुरेश धस यांनी म्हटले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.