AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत नमाज पठणाला कुठे जातात हे…’, भाजपा खासदाराचं वक्तव्य

"अब्दुल कलाम हे रामेश्वरम येथे शिकले. त्यांच्यावर सनातन धर्माचे संस्कार झाले. त्यांच्यावर हिंदुस्तानचे संस्कार झाले. ओसामा बिन लादेनवर कुराणाचे संस्कार झाले. सर्व धर्म खोटे असल्याचे सांगणारे संस्कार झाले. भारतातील मुस्लिमांना ओसामा बिन लादेन नव्हे तर अब्दुल कलाम बनवायचं आहे. आव्हाड यांनी मुंब्रा येथील मुस्लिमांना कलाम बनवावे. त्यांच्या पत्नीने यामध्ये पुढाकार घ्यावा" असं भाजपा खासदराने म्हटलय.

'संजय राऊत नमाज पठणाला कुठे जातात हे...', भाजपा खासदाराचं वक्तव्य
संजय राऊत, खासदार
| Updated on: Sep 27, 2024 | 2:32 PM
Share

“सातत्याने हिंदू संस्थान व मंदिरांबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. नागपूर येथील कोराडी संस्थान 100 वर्षांपूर्वीचे संस्थान आहे. अनेकांचे ते कुलदैवत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात याची प्रगती झाली. 800 विद्यार्थ्यांना एक रुपयात शिक्षण देत आहेत. या संस्थानाबाबत बोलते पोपट संजय राऊत, नाना पटोले, अनिल देशमुख हे कोराडी माते संदर्भात बोलत आहेत. यांची माताही तीच आहे” असं खासदार अनिल बोंडे म्हणाले. “काँग्रेस नेत्यांनी नागपूर मध्ये किती जमिनी लाटल्या? सतीश चतुर्वेदी यांनी किती हेक्टर जमीन लाटली? इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पैसे जमा करण्याचे काम ते करत आहेत” अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.

“मुस्लिम संस्थांची यादी माझ्याकडे आहे. त्या शैक्षणिक संस्था असून आरक्षण लागू होत नाही, तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. याउलट जे अन्नछत्र चालवतात, अशा कोराडी मातेच्या संस्थेवर आरोप केले जात आहेत” असं अनिल बोंडे म्हणाले. “हे संस्थान कुठल्याही कुटुंबाचे नाही. बावनकुळे हे तिथे अध्यक्ष आहेत. दर दोन वर्षांनी अध्यक्षांची निवड केली जाते. याआधी दुसरे अध्यक्ष होते. परिणामी या संस्थेविरोधात खोटे आरोप करून बदनामी केली जातं आहे” असं अनिल बोंडे म्हणाले.

‘संजय राऊत यांना औरंगजेब व टिपू सुलतान आठवेल’

“संजय राऊत काय बोलतील हे सांगता येत नाही. त्यांना धर्मवीर कधीच आठवणार नाही. त्यांना औरंगजेब व टिपू सुलतान आठवेल. त्यांचे धर्मपरिवर्तन झाले आहे. फक्त ते नमाज पठणाला कुठे जातात, हे शोधावे लागेल” अशा शब्दात राऊतांवर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने केलेल्या वक्व्यावरही अनिल बोंडे बोलले.

‘मुस्लिम समाजाने नसत्या भानगडीत पडू नये’

“अमरावतीमध्ये निधड्या छातीने नितेश राणे येतील. सर्व हिंदू बांधव उपस्थित राहतील. मुस्लिम समाजाने नसत्या भानगडीत पडू नये. ईदच्या मिरवणुकीत हिंदू समाजातील लोक स्वागतासाठी उभे होते. उलट गणेशोत्सव मिरवणुकीत दगडफेक केली” असं अनिल बोंडे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली. त्यावरही अनिल बोंडे बोलले. “त्या महिलेचे दु:ख जाणून घेतले पाहिजे. समुपदेशन केले पाहिजे. तिला कोणी पाठवले होते का? मंत्रालय प्रशासनाने याचा शोध घेतला पाहिजे” असं अनिल बोंडे म्हणाले.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.